संभाजी पाटील
जिल्हाध्यक्ष
जुनी पेंशन संघर्ष समिती जळगांव.
हीच वेळ आहे ,सर्व कामे आहे बाजूला ठेवा, लढा यशस्वी करू या. चला तर मग आझाद मैदानावर!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी दिनांक 18 जून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर पेन्शन संघर्ष समितीचे अध्यक्ष संगीताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण सुरू आहे. या आमरण उपोषणास राज्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिली व या आमरण उपोषणाला आतापर्यंत अनेक आमदारांनी भेट देऊन जाहिर पाठींबा दिला. जुन्या पेन्शनसाठी आमरण उपोषणाची दखल घेऊन अनेक आमदार माजी मंत्रीनीं अधिवेशनात लक्षवेधी केली. अधिवेशनाची दखल खुद्द शिक्षण मंत्र्यांनी घेतली खरी पण याबाबत अधिकृत कोणत्याही प्रकारची चर्चा व पत्र नाही यासाठी सोमवारी आमरण उपोषण तीव्र करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपली सर्व कामे बाजूला ठेवून रविवारी मुंबईकडे रवाना व्हा.
सोमवारी निश्चितच आपल्या अमर उपोषणाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही व आपल्यामागे खंबीरपणे
जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी गेल्या अठरा तारखेपासून अन्नाचा कण न घेता संगीताताई शिंदे व त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत.
यांचे हात बळकट करण्यासाठी आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे म्हणून राज्यातील पस्तीस हजार कर्मचाऱ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे .म्हणून जागे व्हा, हीच संधी आहे ,ही संधी पुन्हा येणार नाही .म्हणून सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो आझाद मैदानावरील जुन्या पेन्शनसाठी गेल्या पाच दिवसापासून चाललेल्या उपोषणाला उपस्थिती देऊन तीव्र करू या असे आव्हान जुनी पेन्शन संघर्ष समितीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष संभाजी पाटील यांनी केले आहे.