जिल्हा परिषद शाळा गांधली पिळोदे अमळनेर येथे प्रवेशोत्सव साजरा....
विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप....
अमळनेर प्रतिनिधी
आज दि 17 जून रोजी जिल्हा परिषद शाळा गांधली पिळोदे येथील शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.शालेत इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांची रिक्षा सजवून गावातून मिरवणू क काढण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, चॉकलेट,फुगे देऊन स्वागत करण्यात आले.तसेच पुस्तके वाटण्यात आली.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भगवान संदानशिव,सामाजिक कार्यकर्ते अविनाश पवार,मुख्याध्यापक सुरेखा जयराम पाटील,प्रमोद पाटील सर,रमेश पारधी,अशोक मोरे,रवींद्र पाटील,संजय शिंदे,महानंदा सूर्यवंशी,नूतन पाटील,सुनंदा सोनगिरे,संजय महाजन तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.