Halloween party ideas 2015



शाळा प्रवेशोत्सव दिन साजरा--!

अमळनेर प्रतिनिधी

 अमळनेर येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला . सुरुवातीला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने प्रतिमा पूजन करण्यात आले. तद्नंतर सर्व उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त डी . ए. सोनवणे यांनी तंबाखू, गुटखा, जर्दा, तपकिरी, मिस्त्री इ. सेवनाने आपल्या आरोग्यासाठी किती घातक आणि आपले शरीर कसे गंभीर आजाराला बळी पडते, याविषयी सविस्तर माहिती देऊन आपल्या घरातील आपले नातेवाईक, शेजारी ,जर कोणी अशा गोष्टी खात असेल तर त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करा. असे आवाहन करण्यात आले. तद्नंतर  तंबाखू मुक्तीची शपथ जाहीरपणे देण्यात आली. तद्नंतर सर्व शालेय विद्यार्थ्यांना माता पालक सदस्यां रेखा महेंद्र सूर्यवंशी आणि मंगला उमेश कोळी यांच्या हस्ते शासकीय पुस्तके वाटप करण्यात आली. सदर प्रसंगी मुख्याध्यापक संदीप पवार, पी. एम. ठाकरे, ए. पी. जाधव, व्ही. डी. पाटील. पी. ए. शेलकर, भारती चव्हाण, रविंद्र चौधरी, धर्मेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.