जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आझाद मैदानावर एल्गार
मुंबई प्रतिनिधी
संगीता शिंदे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण
राज्यभरातील हजारो शिक्षकांचा सहभाग,
शिक्षक आमदार कपिल पाटील,दत्तात्रय सावंत,किशोर दराडे,श्रीकांत देशपांडे, बाळाराम पाटील, विक्रम काळे,डॉ सुधीर तांबे यांनी आमरण उपोषणाला दिली भेट*
👍👍👍👍👍👍👍👍👍
*शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांच्या नेतृत्वात आजपासून मुंबई येथील आझाद मैदानावर हजारो शिक्षकांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. जवळपास 5 हजा हजारांहून अधिक शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले असून जुन्या पेन्शनची मागणी तीव्र झाली आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून राज्य सरकारने २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना नाकारलेली जुनी पेन्शन त्यांना मिळवून देण्यासाठी शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यभरातील शिक्षक मुंबई येथे आजपासून लढा देत आहेत*
*१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त खाजगी विना अनुदानित, अंशतः अनुदानित, १०० टक्के अनुदानित शाळेत विना अनुदानित तुकड्यांवर काम करणारे, १०० टक्के अनुदानित तुकड्यांवर अर्धवेळ काम करणारे अशा शिक्षकांना तसेच नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्ती झालेल्या हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांना शासनाने जुन्या पेन्शनपासून वंचित ठेवले आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षण संघर्ष संघटना गेल्या कित्येक वर्षांपासून लढा देत असून न्यायालयात देखील संघटना लढा देत आहे. परंतु आजवरच्या शासनाने संघटनेच्या आणि शिक्षकांच्या आंदोलनाची तसेच मागण्यांची कुठलीही दखल घेतलेली नाही. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांप्रती शासनाची असलेली उदासीनता भविष्यात चांगली पिढी घडविण्याच्या मार्गात अडसर ठरत असल्याची भावना शिंदे यांनी हजारो शिक्षकांच्या समुदायाला संबोधित करताना व्यक्त केली. शिक्षक म्हणजे समाजशील व्यक्तिमत्व असून त्यांच्यावरच अन्याय केला जात असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. शिक्षकांच्या त्यांच्या हक्काचं पेन्शन मिळावं म्हणून जिवाचं रान करण्याची माझी तयारी असून या सरकारला आपण जुनी पेंशन देण्यासाठी भाग पाडू असा ठणठणीत इशारा देखील त्यांनी यावेळी दिला*
*पेन्शनचा संबंध १०० टक्के अनुदानाशी जोडून शासन हजारो अन्यायग्रस्त शिक्षक कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याशी खेळत आहे. सदर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्काचे बाबत शासनाची असंवेदनशील भूमिका शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण करणारी आहे. त्यामुळेच आज हजारो शिक्षकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्याचे शिंदे यावेळी बोलताना म्हणाल्या.*
*आजतागायत आपल्या न्याय्य हक्कासाठी शिक्षक कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी लोकशाही व विधायक मार्गाने शासनाकडे आपली रास्त बाजू मांडली. परंतु शासनाने या संवेदनशील प्रश्नाला गांभीर्याने न घेतल्याने आज मंगळवार १८ जूनपासून शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्षा संगिता शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील हजारोअन्यायग्रस्त शिक्षक कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाचे रणशिंग फुंकले आहे. उपोषण आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण संघर्ष संघटना व पदाधिकारी व हजारो शिक्षक कर्मचारी उपस्थित झालेले आहेत.आज 375 शिक्षक संगीताताई समवेत आमरण उपोषणाला बसले तर 5576 शिक्षक बांधून आणि भगिनि पहिल्या दिवशी उपस्थित होते