संत सखाराम महाराज वाडी संस्थानात तीन मजली भक्त निवास इमारतीचे भूमिपूजन
आ शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी 1 कोटी 90 लाख निधीस मंजुरी,भाविकांची होणार सोय,प्रसाद महाराजांनी केले कौतुक
अमळनेर प्रतिनिधी
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत आ शिरीष चौधरींच्या अथक प्रयत्नांनी अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानात 1 कोटी 90 लाख निधीतून भव्य भक्तनिवास साकारले जाणार असून या कामाचे भूमिपूजन प पु संत प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते वट सावित्री पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले.यावेळी आ शिरीष चौधरी व हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भूमिपूजन प्रसंगी चारुदत्त जोशी व अभय गुरुजी यांनी पूजा विधी केला.दरम्यान सदर भक्तनिवासाची इमारत तीन मजली राहणार असून यात 24 सुसज्ज खोल्या व खाली भव्य सभागृह तसेच इतर आधुनिक पद्धतीच्या सर्व सुविधा उपलब्द होणार आहेत,मंजूर रकमेपैकी पहिल्या टप्प्यात 45 लाख रु निधी प्राप्त झाला असून अतिशय वेगाने हे काम सुरू आहे,आ चौधरी यांनी मोठे प्रयत्न करून मंजूर केले. या विकास कामाला न. प तील 22 नगरसेवकानी विरोध करून तक्रारी केल्या होत्या,मात्र महाराजांच्या आशीर्वादाने आमदारांनी ही अडथळ्यांची शर्यत दूर करत काम मार्गी लावल्याचे न प चे गटनेते प्रवीण पाठक यांनी यावेळी प्रस्तविकात सांगितले.यावेळी श्रीराम चौधरी, पांडुरंग महाजन,नगरसेवक नरेंद्र चौधरी, सलीम टोपी, बाळासाहेब सदांशिव, श्याम पाटील,धनंजय महाजन, सुरेश सोनवणे,पंकज चौधरी, भाऊसाहेब महाजन, साखरलाल महाजन, किरण बागुल,आरिफ भाया, सुनील भामरे,गुलाम नबी, संतोष लोहरे, अतुल कुलकर्णी, सुभाष शिंपी, डॉ मिलिंद वैद्य, गणेश ठाकरे, प्रभाकर कोठावदे, संजय एकतारे, योगेश जैन,दिनेश मणियार,राजू दुसाने,अमृत जाधव, मोतीलाल जाधव, प्रकाश सोनार,सुनील देव,अनिल वाणी, मनोज शिंगाने, नाविद शेख, संदीप पाटील,योगेश पाटील,पराग जैन, प्रमोद जाधव, माऊली मित्र मंडळ सह शिरीषदादा मित्र परिवाराचे असंख्य कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.याप्रसंगी भूमिपूजन होताच सर्वांनी संत सखाराम महाराजांचा प्रचंड जयघोष केला,तर प पु संत प्रसाद महाराज यांनी बाहेरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्या सोयीसाठी हे भक्तनिवास उपयुक्त ठरणार आहे,अमळनेर शहरात होत असलेली विकासकामे पाहून समाधान वाटत असल्याची भावना व्यक्त करत सर्वाना आशीर्वाद दिले.
बोरी पात्रातील मंदिर परिसरात घाटाचेही होणार सुशोभीकरण-आ शिरीष चौधरी
आ शिरीष चौधरी आपल्या मनोगतात म्हणाले की अतिशय प्रामाणिक प्रयत्न करून मी अनेक विकासकामे मार्गी लावली असून कामांचे चित्र जनतेसमोर आहे,संत सखाराम महाराजावर माझीही श्रद्धा असल्याने मी सुरवातीपासून विकास कामांचे योगदान दिले आहे,आता भक्त निवासाचे काम मार्गी लागले असून बोरी पात्रात संत सखाराम महाराज समाधी परिसरात घाट सुशोभित करण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे लवकरच या कामाला मंजुरी मिळून बोरी पात्राचे रंगरूप यामुळे पालटेल. माझ्या प्रत्येक कामाचे श्रेय आमच्या सहकारी आमदार घेत असताना येथेही त्यांनी त्यांची श्रेय घेण्याची परंपरा कायम ठेवून महाराजांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला,मात्र मंजुरीचे कागद आमच्या प्रयत्नांचे साक्षीदार असल्याने त्यांचा प्रयत्न फेल गेला,भविष्यात अशीच विकासाची गंगा कायम दिसेल अशी ग्वाही आ चौधरी यांनी यावेळी बोलताना दिली.
होय भक्त निवासाला विरोध करणारेच ठरले अपात्र-डॉ रविंद्र चौधरी
हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद चौधरी आपल्या मनोगतात म्हणाले की विरोध असावा पण तो तात्विक न प तील या सत्ताधारी मंडळींना विरोध कुठे करावा याचे भान नसून अमळनेर सह पंढरपूर व राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सखाराम महाराज संस्थांनसाठी आ शिरीष चौधरी यांनी मंजूर केलेल्या या भक्त निवासाला देखील मा नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष व 22 नगरसेवकांनी चक्क लेखी विरोध करून बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या,आणि तक्रारी करताना एक भक्त निवास झाले असल्याने दुसरे नको असे कारण यांनी दाखविले,आता काय म्हणाल यांच्या मानसिकतेला,संत सखाराम महाराजांचा भक्तपरिवार राज्यभर व परराज्यात असून असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येत असतात,आणि भक्तांसाठी निवासाची व्यवस्था वाढल्यास भाविकांचा ओघ देखील वाढेल यामुळे येथे एक दोन नव्हे तर यापेक्षा जास्तीचे भक्तनिवास येथे असावेत हाच आमचा प्रयत्न असून फालतू कारणास्तव विरोध करणाऱ्याना आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत,याआधी देखील यानीं कलाली डोहातील तत्कालीन पाणी पुरवठा योजना,छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा,भुयारी गटार आदी चांगल्या विकासकामांना स्पष्ट विरोध केला असून येथील तरुणांना रोजगार उपलब्द करण्यासाठी आमच्या सुतगीरणीच्या प्रकल्पालाही हे सतत तक्रारी करून विरोध करीत आहेत,यामुळेच त्यास विलंब होत आहे,म्हणजे एकाने आमच्या कामाचे श्रेय घ्यायचे आणि दुसऱ्याने विरोध करायचा हेच उद्योग यांचे आहेत,मात्र जो या भूमीच्या विकासाला बाधक ठरेल त्याचा अंत निश्चित असून याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अपात्र ठरलेले 22 नगरसेवक होय,एकदा नव्हे तर दोनदा ते अपात्र झाले असून आता कोणत्याही परिस्थितीत ते माजी झाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे,कारण भक्तनिवासाला यांनी विरोध केल्याने भक्तांचा श्रापच यांचा अंत करेल असा विश्वास डॉ चौधरी यांनी शेवटी व्यक्त केला.