हरिनामाच्या गजराने दुमदुमले अमळनेर
वाडी संस्थानाची पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना.
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील संत सखाराम महाराज विठ्ठलाचे नामस्मरण करून वाडी संस्थानातून पायी दिंडी पंढरपूर कडे रवाना झाली .संत प्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी या पायी दिंडी मध्ये सहभाग नोंदवला ही पायी दिंडी बावीस दिवसांच्या प्रवासानंतर 10 जुलैला पंढरपुरात दाखल होणार आहे.
या पायी दिंडीचे 32 वर्षे आहे संत प्रसाद महाराजांनी सर्व भक्तांना प्रसाद दिला व आशीर्वाद दिले यावेळी अमळनेर तालुक्यातून अनेक महिला पुरुष व भाविकांनी या दिंडीमध्ये सहभाग नोंदवून टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. संत प्रसाद महाराज यांच्या समवेत 250 भाविकांनी या दिंडीत सहभाग नोंदविण्याचे भाग्य त्यांना मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
दिंडीचा पहिला मुक्काम पारोळा येथे आहे तिथून आडगाव भडगाव नगरदेवळा नेरी, नागद ,बिलखेडा ,नागापूर , चिखलठाण ,टाकळी, दौलताबाद, पैठण, शेवगाव ,पाथर्डी ,धामणगाव, आष्टी निंभोरा मार्गे दहा जुलैला पंढरपूर येथे पोहोचणार आहे.