त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती हेडावे येथील अँड श्रावण सदा ब्रम्हे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने व्हाईस चेअरमन पदी निवड करण्यात आली.
तर मार्केटच्या स्वीकृत सदस्यपदी दहिवद खुर्द येथील किरण हिरालाल पाटील यांची निवड करण्यात आली.
बाजार समितीत बाजार समितीत सभापती उदय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली बाजार समितीचे उपसभापती अनिल अंबर पाटील यांचे निधन झाल्याने उपसभापती पदासाठी जागा रिक्त झाली होती यात उपसभापतीपदी एडवोकेट ब्रम्हे
स्वीकृत संचालक पदी किरण पाटील यांना संधी देण्यात आली या बैठकीस संचालक विश्वास पाटील ,प्रफुल पाटील, सुरेश पाटील ,पराग पाटील, विजय पाटील ,महेश देशमुख ,सचिन पाटील, मंगलाबाई पाटील ,उज्वला पाटील, भगवान कोळी ,पावभा पाटील ,हरी वाणी,शंकर बितराई,महेंद्र पाटील, भटा पाटील, रेखाबाई पाटील, पद्माकर गोसावी, उदय पाटील आदी संचालक उपस्थित होते.
यावेळी आयोजित सत्कार समारंभात माजी आमदार साहेबराव पाटील, कामगार नेते रामभाऊ संदानशिव, खा.शी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा ,काग्रेसच्या अँड ललिता पाटील,भाजपचे शहराध्यक्ष शितल देशमुख, पंचायत समितीच्या सभापती व वजाबाई भिल, माजी सभापती श्याम आहिरे, मार्केट चे सर्व संचालक व भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
अँड ब्रम्हे निवड झाल्यानंतर म्हणाले की भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व बाजार समितीचे सभापती उदयजी वाघ व आमदार स्मिताताई वाघ व संचालक मंडळानी माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी आभार मानतो.व माझा सत्कार केला मी ऋणात राहू इच्छितो.शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील असे सांगितले.