अमळनेर प्रतिनिधी- अमळनेरला मराठी साहित्य परिषद शाखा अमळनेर यांच्यावतीने युवा नाट्य संमेलन असे विविध उपक्रम राबवून संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यिक लेखक ,कवी, कलाकार ,दिग्दर्शक ,आल्याने अमळनेर ची शान साहित्य परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी महाराष्टभर तालुक्याचे नावलौकिक केला.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या येथील शाखेतर्फे परिवर्तन निर्मित
अपूर्णांक या नाटकाचा 45 वा प्रयोग रविवारी (ता.30) सायंकाळी 7
ला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे. स्त्री पुरुष नात्याचा शोध घेणाच्या अपूर्णांक हे नाटक मोहन राकेश
यांनी लिहिले असून जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी मराठीत रूपांतर
केले आहे. नारायण बाविस्कर हे दिग्दर्शक असून मिलिंद जंगम यांनी
पार्श्वसंगीत दिले आहे. या नाटकात मंजुषा भिडे, प्रतीक्षा कल्पराज,
मोना निंबाळकर, राहुल निंबाळकर, शंभू पाटील यांनी भूमिका केल्या
आहेत. पुरुषोत्तम चौधरी व हर्षल पाटील निर्मिती प्रमुख असून
होरीलसिंग राजपूत सहकार्य करतील. नाट्य प्रेमींनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष रमेश पवार, दिलीप सोनवणे, संदीप घोरपडे, भाऊसाहेब देशमुख, दिनेश नाईक, संजय चौधरी, शरद सोनवणे व नरेंद्र निकुंभ ,निरंजन पेंढांरे गायकवाड मँडम,यांनी केले आहे.