समाजबांधव व मित्रपरीवाराकडून शुभेच्छा!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
येथील विविध सहकारी संस्थेच्या सोसायटीच्या चेअरमनपदी गुलाब भिका चौधरी तर व्हाइस चेअरमन पदी धनराज यादव चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागील वर्षात निवड झालेल्या माजी चेअरमन पुष्पाबाई गुलाब महाजन व व्हाइस चेअरमन मंगल ठाणसिंग राजपूत यांनी ठरलेल्या कालावधी प्रमाणे राजीनामा दिल्याने ,रिक्त जागी नवीन निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी अमळनेर येथील सहायक निबन्धक यांनी सर्व संचालक मंडळाची सभा घेण्यात आली. यावेळी चेअरमन ,व्हाइस चेअरमन पदासाठी एक एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निबन्धक जी एच पाटील यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले. याप्रसंगी जितेंद्र राजपूत,नत्थू चौधरी, पुष्पाबाई महाजन, भिकेसिंग राजपूत, सुदाम चौधरी,कडू चौधरी,झुलाल चौधरी,किरणसिंग राजपूत ,रमेश चौधरी ,वासुदेव चौधरी,गणेश चौधरी, शिवराम कुंभार,नगराज चौधरी, जगदीश चौधरी सर्व संचालक मंडळ व गावातील पदाधिकारी ,ग्रामस्थ उपस्थित होते.
छाया-कळमसरे ता.अमळनेर -गुलाब चौधरी,धनराज चौधरी यांचा सत्कार करताना संस्थेचे पदाधिकारी झूलाल चौधरी ,नत्थू चौधरी,जितेंद्र राजपूत, रमेश चौधरी आदी.