शासनाच्या चुकीच्या धोरणाचा विद्यार्थ्यांना फटका.
अमळनेर प्रतिनिधी-
बी फ़ार्मेसी ,इंजिनियरींग यासारखे 52कोर्स साठी विद्यार्थ्यानीं 7जुन पासुन ते 15जुन पर्यंत registration व 15जुन ते 20पर्यंत अर्ज नोदणी विद्यार्थ्यानीं SAAR portal ला केली. परंतू प्राधिकरण व CET या शासनाच्या विभागाने 20तारखेला ते रद्द केले .व 24जुन पासुन नविन अर्ज नोदणी चालू होईल असे पत्रक काढले .यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मध्ये संताप व्यक्त होत आहे .या प्रकियेत 4लाख विद्यार्थ्यानपैकी अडीच लाख विद्यार्थ्यानी अर्ज नोंदणी केली होती .त्या प्रक्रियेसाठी 42रुपये फी शासनाकडे जमा केली आहे .
व त्यानंतर पाल्यांनी धावपळ करून आपली कामे बाजुला ठेवून नोंदणी केली.
अडीच लाख विद्यार्थ्यांचे अर्ज काही चुका असतील तर बरोबर करुन त्यांची प्रक्रिया तशीच ठेवावी व 24जुन पासुन उर्वरित विद्यार्थ्यांची नोदणी करावी असे एका पत्रकाद्वारे फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष भूषण भदाणे यांनी मागणी केली आहे.