वार्षिक नेल्डा सन्मान सोहळा- २०१९ मध्ये ग्रामपंचायत नगांव खु॥, तालुका-अमळनेर, जिल्हा-जळगाव पर्यावरण संवर्धन पुरस्काराने सन्मानित.
अमळनेर प्रतिनिधी
पुणे येथे नेल्डा सन्मान सोहळा- २०१९ रविवार, दि. 23 जून २०१९ संध्या. ५ वा. जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल, कॅम्प, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता ह्या सन्मान सोहळ्यासाठी एकुण ११ मानांकनासाठी १३३ विविध सामाजिक व ग्रामपंचायत संस्थाची निवड करण्यात आली होती पर्यावरण संवर्धन मानांकनासाठी एकुण ३७ संस्थांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येक संस्थांनी वैयक्तिक पातळीवर आपण केलेल्या कामाविषयी माहित असलेल्या परिचित लोकांना आॅनलाईन मतदानचे आव्हान केले होते, आपणां सर्वांना सांगतांना मनस्वी आनंद होतोय की, नगाव खु॥ ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कामाची दखल आपण दिलेल्या आँँनलाईन मतदानामुळे नेल्डा फाऊंडेशनने घेतली व पर्यावरण संवर्धन ह्या मानांकनात ग्रामपंचायत नगाव खु॥ ची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे. नेल्डा फाऊंडेशनचे व आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद...