Halloween party ideas 2015

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक विभागीय बैठक धुळे येथे संपन्न

 संघटनात्मक बांधणी करणे काळाची गरज

बाळासाहेब कर्डक

धुळे प्रतिनिधी-

आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या

आहेत यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद च्या माध्यमातून गाव तेथे शाखा उभारणे काळाची गरज आहे व संघटनेची बांधणी करणे तेवढेच गरजेचे आहे. संघटनेच्या माध्यमातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित असलेला समाजरचना निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे ही प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे म्हणून संघटनात्मक बांधणी करणे गरजेचे आहे असे नाशिक विभागीय अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे येथील बैठकीत अध्यक्षीय भाषणातून कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब कर्डक बोलत होते.

       बैठकीच्या सुरुवातीस तात्यासाहेब महात्मा फुले यांचे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.कै.कृष्णकांत कुदळे व शिरपिर येथील सुरेश माळी यांच्या मातोश्रीना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.प्रास्तविक धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांनी सादर केले.यानंतर बापूसाहेब भुजबळ यांची राष्ट्रीय कार्यध्यक्ष पदी ,प्रा.हरी नरके यांचे राष्ट्रीय सरचिटणीस,मा.बाळासाहेब कर्डक नाशिक विभागीय अध्यक्ष व दिलीप खैरे नाशिक जिल्हाअध्यक्ष पदी स्तुत्य निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.नंतर बैठकीत संघटन मजबुतीसाठी उपस्थित पदाधिकार्यांची मनोगते झाली.धुळे,नंदुरबार जिल्हाअध्यक्ष राजेंद्र वाघ,जळगाव जिल्हाध्यक्ष सतीश महाजन मनोगते झाली.मा.बाळासाहेब कर्डक यांनी अध्यक्षीय मनोगतातून समता सैनिकांना बहुजन कार्यकर्त्याना संघटनेत जोडण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नमूद केली.प्रतिकूल परिस्थिती हि संघटनेच्या बांधणीसाठी चालून आलेली संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी दिलीप आप्पा देवरे,सतीश तात्या महाले,वसंत पाटील,महानगर प्रमुख गोपाळ देवरे,नाशिकवरुन आलेले अरुण थोरात अनिल नाळे,संतोष पुंड,मिलिंद सोनवणे, ज्ञानेश्वर महाजन ,गोकुळ पाटील,गणेश देवरे,सतीश बाविस्कर पंकज सोनवने, राजेंद्र माळी, आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.रविंद्र सुर्यवंशी,तर आभार प्रदर्शन योगेश बागुल यांनी केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.