लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब साळुंखे
मारवड जि.प.शाळेत शालेय साहित्य वितरण सोहळा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी- जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मारवाड गावाचे भूषण कै. गिरीश दादा पाटील यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम त्यांच्या आठवणींना जिवंत ठेवण्याचा एक स्तुत्य उपक्रम आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन भविष्यात ते चांगले अधिकारी बनतील असे मारवड येथील कै. गिरीशदादा पाटील यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून मारवाड नगरीतील लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील अध्यक्षीय भाषणावरून बोलत होते.
मारवड येथील पोलीस निरीक्षक लोकनायक गिरीशदादा पाटील यांचे स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नुकतेच शालेय साहित्य वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मूळ मारवडचे रहिवासी पण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी स्थाईक झालेले अधिकारी,नोकरदार,व्यावसायिक श्री.विजयकुमार सुंदरलाल झवर पाळधी,प्रा.डॉ.डी.बी.साळुंखे जळगाव,श्री.मुकुंदराव गुरव अहमदाबाद,श्री.राकेश साळुंखे,नाशिक,श्री.गिरीशभैय्या शिंदे नंदूरबार,श्री.यशपाल सोनवणे धुळे,श्री.राजकुमार जैन,बभळाज,श्री.सुधाकर सुर्यवंशी जळगाव,श्री.भगवान हिवरे ठाणे,श्री.प्रदिप चौधरी मारवड,श्री.नरेंद्र पाटील गोवर्धन या दानशूर दात्यांनी शालेय दप्तर,शैक्षणिक साहित्य कंपासपेटी,पिण्याच्या पाण्याच्या बाॕटल,शैक्षणिक वह्या,विद्यार्थ्यांना खाऊ,इत्यादी साहित्याचे वाटप केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष *प्रथम लोकनियुक्त सरपंच मा.भैय्यासाहेब उमेश रामकृष्ण साळुंखे* होते.तसेच कार्यक्रमाचे *प्रमुख अतिथी म्हणून माजी.जि.प.सदस्य मा.बापूसाहेब शांताराम शामराव साळुंखे हे होते.*
याप्रसंगी *धुळे डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.डी.बी.साळुंखे* यांनी गिरीश दादांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याला उजाळा दिला.तसेच जि.प.शाळेला सर्वांग सुंदर शाळेचा पुरस्कार मिळाल्या बद्दल अभिनंदन केले.व पुढील काळात शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
*लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब उमेश साळुंखे* यांनी गिरीशदादांच्या आठवणी व त्यांचे समाजकार्य या संदर्भात भावपूर्ण विचार व्यक्त केले.तसेच आगामी काळात मारवडच्या सर्वांगिण विकासासाठी विविध विकास कामांचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल असेही सांगीतले.
*माजी जि.प.सदस्य शांताराम बापूंनी* शाळेची भौतिक व शैक्षणिक प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. तसेच दानशूर दात्यांविषयी गौरवोद्गार काढून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब श्री.उमाकांत साळुंखे,,वि.का.सोसायटीचे चेअरमन श्री.देविदास निंबाजी साळुंखे,ज्येष्ठ ग्रा.पं.सदस्य श्री.बी.डी.काका साळुंखे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,श्री.हरिभाऊ मारवडकर, डॉ.विलासराव पाटील,सु.हि.मुंदडे हायस्कुल ज्यु.काॕलेजचे प्राचार्य श्री.एल्.जे.चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे श्री.रुपेश पाटील,कासम दादा, भाऊराव भाऊसाहेब,विनोद चौधरी,समाधान पाटील,प्रफुल्ल साळुंखे,इ.गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिरीश दादा मित्र परिवार ग्रूपचे मावळे --समाधान पाटील प्रदीप चौधरी सर नरेंद पाटील व दोन्हीही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद,व स्थानिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.