Halloween party ideas 2015


जुन्या पेन्शनसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदानावर आमरण उपोषणास रवाना

अमळनेर प्रतिनिधी

2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी आजपासून आझाद मैदानावर मुंबई येथे आमरण उपोषणास राज्यातील पस्तीस हजार शिक्षक उपोषणास बसणार आहेत.

 2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी. यासाठी जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या राज्य अध्यक्ष संगीता ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात पहिल्या टप्प्यात सर्व आमदारांना व खासदारांना व मंत्री यांना निवेदन देऊन एक दिवस जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले .आता दुसरा टप्पा दिनांक अठरा जून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने राज्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

  सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार व सर्व सहकारी मंत्री यांनी एक मताने 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर जुनी पेन्शन च्या संदर्भात जो अन्याय झाला आहे तो दूर करून त्यांना जुन्या पेन्शनचा लाभ घ्यावा हे विधेयक बहुमताने मंजूर करावे आणि त्याला सर्व उपस्थित आमदारांनी मंजुरी द्यावी अशी मागणी 2005 पूर्वी पीडीत

 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

       महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी आझाद मैदानावर उपोषणास आपल्या शाळेतील काही शिक्षकांना पाठवून आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी उपस्थिती द्यावी असे  आव्हान पेन्शन संघर्ष समितीचे अध्यक्ष संगीताबाई शिंदे व सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर चोपडा, पारोळा ,एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, रावेर, यावल, पाचोरा ,भुसावल, व जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मुंबईकडे आझाद मैदानावर रवाना झाले आहेत.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.