अमळनेर प्रतिनिधी
उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आज, सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत. यामुळे रविवारी संध्याकाळी पालकांनी गणवेश, शालोपयोगी वस्तू, छत्री, रेनकोट यांच्या खरेदीसाठी रविवारी बाजारात एकच गर्दी केली होती.
शाळा सुरू होत असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असताना राज्यातील मराठी आणि प्रादेशिक भाषांच्या शाळांमधील २० टक्के अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांनी राज्य सरकारविरोधात आज, सोमवारपासून आझाद मैदानात आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
त्यामुळे 'विद्यार्थी शाळेत तर शिक्षक आंदोलनावर' असे चित्र पाहावयास मिळणार आहे. २००५ पुर्वी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाला जुनी पेंशन मिळावी म्हणून आमरण उपोषणाला बसले आहेत
दुसरीकडे सरकारी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाचे दडपण येऊ नये म्हणून प्रवेशोत्सव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.