गणेश शिंदे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार अभिनेते सचिन कुमावत यांच्या हस्ते
अमळनेर प्रतिनिधी
पत्रकार हा समाजाचा खऱ्या अर्थाने हितचिंतक असतो. पत्रकारांच्या सेवेमुळे समाज जीवन उजळून निघते.त्यांच्या लेखणीच्या अंकुशाने शासन, न्यायव्यवस्था, लोकप्रतिनिधी, प्रशासन ,आरोग्य, शिक्षण, साहित्य, शेती, व्यवसाय, गुन्हे, भ्रष्ट्राचार ,धार्मिकता, अंधश्रद्धा आदी विषयांवर लेखणीच्या अंकुशाने जनतेचे हित जोपासण्याचा यशस्वी प्रयत्न पत्रकार हे सातत्याने करीत असतात हा,प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेवून , मुक्ताईनगर संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशन तर्फे
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आदर्श पत्रकार पुरस्कार हा परिपूर्ण डिजिटल मंच या ग्रुपच्या ऑनलाइन वेबसाईचे लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी गणेश शिंदे यांना आ मा पालकमंत्री राष्ट्रीय पुरस्कार खान्देशी केसांवर फुगे या गाण्याचे दिर्गदर्शक अभिनेते सचिन कुमाव व गायक अभिनेते अण्णाभाऊ सुरवाडे गोदावरी हॉस्पिटलचे मा खा डॉ उल्हास पाटील यांच्या हस्ते देण्यात आला ,मुक्ताईनगर संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशन ही सामाजिक संस्था असून या संस्थे मार्फत मुख्यत सामाजिक विविध उपर्कम करण्याचा प्रयत्न केले जातात. विकसनशील देशांतील, जनतेसाठी मूलभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने उचलावी असे गृहीत धरले जाते.तरी मात्र या संस्थेने समाजातील प्रत्येक नागरिकाचे प्राथमिक हक्क म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता व रोजगाराचे मार्गदर्शन असे सामाजिक काम या संस्थे मार्फत केले जात आहे, तसेच या संस्थेतर्फे सामाजिक राजकीय व्यवसायिक शैक्षणीक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्यांना राष्टीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जातात, १५ जून २०१९ शनिवार रोजी दु ,४ वा भुसावळ नहाटा कॉलेज हॉल मध्ये पाचव्या वर्धपन दिनानिमित्त या पुरस्काराचे आयोजन केले होते , या निमित्ताने या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार खान्देशी केसांवर फुगे या गाण्याचे दिर्गदर्शक अभिनेते सचिन कुमाव व गायक अभिनेते अण्णाभाऊ सुरवाडे अध्यक्ष छबिलदास पाटील व उपाध्यक्ष यांच्या सर्व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते