Halloween party ideas 2015

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये नववर्ष संकल्प दिन उत्साहात साजरा
अमळनेर प्रतिनिधी -सरत्या वर्षात अपूर्ण संकल्प नवीन वर्षात पूर्ण करण्यासाठी संकल्प दिन साजरा करण्यात आला. आपले भावी आयुष्य यशस्वी करायचा निर्धार विद्यार्थ्यांनी करावा सामाजिक भान संदेश देशाप्रती आदरभाव निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे उद्देशाने सदरचा नववर्ष संकल्प दिन साजरा करण्यात येत असल्याने मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी
प्रतिपादित केले. विकास होऊन तिची केवळ स्वप्न न पाहता ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करावा या संकल्प सिद्धी चा निग्रहाने निर्धार जीवनाचे साफल्य आहे असे विद्यार्थ्यांना संबोधित करताना शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी सांगितले. नववर्ष संकल्प दिनानिमित्त आणि महात्मा फुले हायस्कूल मधील
विद्यार्थ्यांना सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना व्हेज बिर्याणी व जिलेबीचे मिष्टान दिले.यामुळे नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत होते
   सकाळी शाळेत आल्यानंतर विद्यार्थिनींनी शाळेच्या पटांगणात रांगोळी काढून शाळेचा आजूबाजूचा परिसर स्वच्छतेचा संदेश देत होता. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी जेवणाचा आनंद घेतला यावेळी शाळेचे शिक्षक आय .आर. महाजन ,एस .के .महाजन , एच ओ.माळी  व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एन.जी. देशमुख, संभाजी पाटील ,गुरुदास पाटील व शालेय पोषण आहार च्या कर्मचारी आशा पाटील, कल्पना महाले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.