शालेय तायक्वांदो स्पर्धेत आर्मी
स्कुलचा विद्यार्थी राज्यस्तरावर
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
- अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत यश संपादन करून नावलौकिक वाढविला आहे. तायक्वांदो स्पर्धेत अजय जयवंत वसावे हा विभागावर विजेता ठरला असून त्याची राज्यस्तरावर निवड झाली आहे या पार्श्वभूमीवर त्याचा संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री नानासो विजय नवल पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी आर्मी स्कुलचे प्राचार्य पी.एम.कोळी, आयटीआयचे प्राचार्य किरण बाविस्कर, बीएड चे प्राचार्य पी.पी.चौधरी, प्रा. के.डी.देवरे,कृषी विद्यालयाचे कुलदीप कदम, एच.एस.पाटील, आर.ए.घुगे, संदीप ढोले, उमेश काटे, बबन पाटील, मन्सराम शिसोदे आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत रोशन पाडवी, अजय जयवंत वसावे, अजय प्रभाकर वसावे प्रथम आले असून यांची विभागावर निवड झाली आहे. तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत कर्तव्य माळी, अश्विन पवार, विशाल बच्छाव तर तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ललित पावरा, कर्तव्य माळी, हर्षद पाडवी हे तालुक्यात प्रथम आले आहेत. तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथमेश कदम, भावेश पाटील, विनायक बारेला, मयूर पाटील, सचिन बच्छाव हे विविध वजन गटात प्रथम आले.तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत निखिल घुले विजेता तर ईश्वर पाटील उपविजेता ठरला. शिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत कर्तव्य माळी प्रथम आला. तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत शाळेचा संघ उपविजेता ठरला.या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक आर.ए.घुगे, प्रशिक्षक संतोष बिऱ्हाडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या मार्गदर्शक शिलाताई पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील यांच्यासह शिक्षकांनी कौतुक केले आहे.
फोटो
विजय नाना आर्मी स्कुलमधील खेळामध्ये विशेष गुण संपादन करण्यार्या विदयार्थीनचा सत्कार करतांना माजी मंत्री विजय पाटील, व प्राचार्य व शिक्षक