देवगांव देवळी हायस्कूल मध्ये निवडणूक संदर्भात मार्गदर्शन.
अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कुलमध्ये निवडणूक प्रक्रिया याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व मान्यवरांचे स्वागत शिक्षक आय.आर महाजन यांनी केले.निवडणूक प्रक्रिया व निवडणूकीत अठरा वर्षे पुर्ण झा्ल्यानंतर नाव नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे व फार्म कसा भरावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन जिल्हा परीषद देवळीचे शिक्षक व बी.एल.ओ.आर.एम.महाले यांनी तहसीलदार यांच्या आदेशानुसार सविस्तर माहिती दिली.
निवडणूक प्रर्कियेत मतदान कसे करावे ,याबाबत जनजागृती व्हावी यासाठी आठवी ते दहावीच्या विदयार्थीना सखोल मार्गदर्शन केले.मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजली पाहिजे हा या मागचा शासनाचा उद्देश आहे.
शेवटी आभार शाळेचे शिक्षक एस.के.महाजन यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले
फोटो
पहील्या छायाचित्रात
निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करतांना शिक्षक आर.एम.महाले व शिक्षक अरविंदजी सोनटक्के, सुरेश महाजन,आय.आर.महाजन