Halloween party ideas 2015

*' गोर संस्कृतीचे' महानायक  देशमुख धर्माजी जाधव*-----------
               पारोळा तालुक्यात  वसंतनगरसह पिंपळकोठा, भोलाणे, जामदे गावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुण दिली.असे महान व्यक्तिमत्व *'गोरसंस्कृतीचे महानायक'* व पारोळा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती कै. देशमुखजी धर्माजी जाधव यांचे आज ता.2 ऑक्टोम्बर द्वितीय पुण्यस्मरण त्यानिमित्त त्यांचा कार्याचा घेतलेला आढावा..................
                 *'मरावे परी किर्ती रुपे उरावे'* अशा प्रकारचे अमर व्यक्तिमत्व कै. देशमुखजी धर्माजी  जाधव  होय.बंजारा समाजातील सर्वमान्य नेतृत्व गोर *'संस्कृतीचे महानायक'* कै. देशमुखजी जाधव यांनी  गोरसंस्कृती मुखोदगत ठेऊन ती येणाऱ्या पिढीला पुस्तकी रूपाने देऊन समाज संस्कृती टिकवून ठेवन्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. कै. जाधव यांनी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती पदापर्यंत नेतृत्व करीत प्रभावी समाजकारण ही त्यांनी केले.  या पाश्वभूमिवरच त्यांनी वसंतनगर तांडयात शिक्षणाची सोय उपलब्ध करुण दिल्याने, तालुक्यासह जिल्ह्यात चांगला आदर्श निर्माण केला आहे.त्यांनी शिक्षणाची खरी गरज ओळखून तांडयात प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक(कला,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आज सुरु आहेत.यामुळेच गावात शिक्षणाची गंगा दाराजवळ आणल्याने वसंतनगरसह परिसरातील ते शिक्षणाचे  भगीरथ ठरलेले आहेत.

                 कै. देशमुख जाधव यांच्या संस्काराच्या जडघडनीने जाधव परिवारातील सदस्यही त्यांच्याप्रमाणेच आपला कर्तुत्वाचा ठसा उमटवित आहेत.मोठे सुपुत्र इंदल जाधव यांनी कुटुम्बाची जबाबदारी धुरा सांभाळत, प्रकाश जाधव यांनीही राजकारणात सक्रिय होत सरपंच पदापासुन पंचायत समिती सभापती पदापर्यंत मजल मारली आहे.चत्रु जाधव यांनी गावाची पोलीस पाटीलकी सांभाळली .रमेश जाधव यांनी शिक्षकीपेशा सांभाळत  ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.तर देशमुखजी जाधव यांचे लहान सुपुत्र सुभाष जाधव यांनीही गटविकास अधिकारी म्हणून जिल्ह्यात सक्षम अधिकारी अशी उत्कृष्ट धुरा सांभाळत ,जिल्ह्यातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल होत असलेल्या ग. स. सरकारी पतपेढीच्या राजकारणात सलग तीन पंचवार्षिक निवडून येण्याचा बहुमान मिळवित ,चेअरमन पदाची धुरा सांभाळत विद्यमान संचालकपदी विराजमान आहेत.मागील दोन वर्षापूवी उत्कृष्ट अधिकारी म्हणून ते गौरविले गेले होते. कै. जाधव यांचे लहान बंधु  दलपत जाधव यानीही सरपंचपदाची धुरा सांभाळत गावात सर्वमान्य नेतृत्व केले आहे.तर पुतण्या प्रा.डॉ. हुकुमचंद जाधव हे वरिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत.आदरणीय कै. जाधव हे समाजकारणात राजकारणात राहूनसुद्धा आपली पारंपारिक वेशभूषा ,बोली भाषा,आणि मुखोदगत गोरसस्कृतीचा इतिहास सांभाळत होते.म्हणूनच देशमुख जाधव यांच्यासारखे व्यक्तिमत्व होणे नाही हे नक्की !

             संकलन------ प्राचार्य--डी एम पाटील वसंतनगर ता.पारोळा

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.