प्रहार जनशक्ती पक्ष अमळनेर तालुका अध्यक्ष पदी पंकज पाटील यांची नियुक्ती
अमळनेर प्रतिनिधी :- दहिवद गावांतील शेतकरी कुटुंबात जन्मलेले पंकज उर्फ श्यामकांत जयवंतराव पाटील यांची शेतकऱ्यांचे लोकप्रिय आमदार मा.बच्चू भाऊ कडू संस्थापक अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष यांनी अमळनेर तालुका अध्यक्ष पदाची नियुक्ती २९ सप्टेंबर रोजी केली . विभागीय प्रमुख दतू बोडके यांच्या सांगण्यावरून जिल्हा अध्यक्ष विजय भोसले यांनी पंकज पाटील यांना नियुक्ती पत्र दिले.
पंकज पाटील हे मुळचे दहिवद गावाचे रहिवासी आहेत. अमळनेरच्या सामाजिक ,राजकीय वर्तुळात अवघ्या तीन वर्षापुर्वी जनतेला माहित झालेले नांव म्हणजे पंकज पाटील .तालुक्यातील रेशन भ्रष्ट्राचार उघड करून आता पर्यंत त्यांनी तालुक्यात रेशन गैरकारभार करणाऱ्या ८ रेशन दुकानांचा परवाना रद्द केला आहे .त्यासाठी त्यांनी चार वेळा तहसिल कार्यालयासमोर उपोषण देखिल केले. दहिवद येथे त्यांनी हजारो झाडे जगवली असून त्यासाठी त्यांना अग्रोवल्ड तर्फे राज्यस्तरीय वृक्ष मित्र पुरस्कार मिळाला आहे.राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य हे मा.बच्चू भाऊ कडू यांच्या सारखेच असून त्यांना अमळनेर तालुक्याचे बच्चू भाऊ म्हणून ओळखले जाते.
मा.आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबाच्या जिवन उत्कर्षासाठी ,पाडळसरे धरणाच्या पुर्तीसाठी आपले लक्ष असेल. अपंग,दिन-दुबळ्या,गरीब व समस्त नागरिकांचा सामाजिक आर्थिक विकासाच्या उदिष्टासाठी मी कटीबद्ध राहू असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. तसेच त्यांनी तालुक्यातील मा.बच्चू भाऊ कडू यांच्या विचारानी प्रेरित असलेल्या युवकांना व नागरिकांना प्रहार जनशक्ती पक्षात सहभागी होण्याचे आव्हान केले आहे .
फोटो
प्रहार जनशक्ती संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी पकंज पाटील यांना नियुक्तीपत्र देतांना जिल्हाध्यक्ष विजय भोसले सोबत शिवाजी पारधी
छाया ईश्वर महाजन अमळनेर