Halloween party ideas 2015

शारदा हायस्कुलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनीं राबवली स्वच्छता मोहीम
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
१५ सप्टे.ते २ आॅक्टो.स्वच्छता पंधरवाडा प्रत्येक
शिक्षकाला कामाची वाटणी करून नियोजनबद्ध पाळण्यात आला.२ आॅक्टो.च्या पूर्व संध्येला शाळेपासून मारूती मंदिरापर्यंत स्वच्छतेवर शेवटचा हात फिरवतांना शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे शाळेचे विद्यार्थी,डी.डी.राजपूत व विकास  महाजन सर .... ! शाळेने केलेल्या सुचनांची काटेकोरपणे पालन व तात्काळ अमंलबजावणी करणारा  शिक्षक/शिक्षकेतर वृंद.हेच आमचे भूषण,हाच आमचा स्वाभिमान...  जी.टी.टाक प्रशासन अधिकारी कळमसरे यांनी सांगितले.
अमळनेर तालुक्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी शारदा माध्यमिक व एन एम.कोठारी कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ,प्रशासन अधिकारी जी.टी.टाक,यांचे मार्गदर्शन शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना मिळत असते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.