Halloween party ideas 2015

पोटखराब जमीन आता वहीताखाली येणार
माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्याचे विकासरत्न कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी विधानसभेत  पोटखराब जमीनीच्या बाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.कि सातबारा उतारावर पोटखराब जमीन आता वहीताखाली येईल असा शासनाने निर्णय घेतल्यामुळे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे.
    याच्या अगोदर सातबारा उता-यावरील पोटखराब जमीन वहीताखाली येत नव्हती. हे क्षेत्र नोंदीत नसल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार होत नसे याबाबत ५ जुन २०१३ रोजी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी विधानसभेत प्रश्न केला होता .तेव्हा तत्कालीन कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी आमदार पाटील यांचा प्रश्न समजून तो मान्य कसा आहे हे विधानसभेत सांगितले होते.त्याची दखल घेऊन शासनाने ५ सप्टेंबर २०१८ रोजी नुकताच अध्यादेश काढला आहे. पोटखराब जमीनीचे सपाटीकरण जेसीबीच्या साहयाने करुन त्यावर गाळ,काळी माती टाकण्यात यावी मग ती जमीन शेतकऱ्यांच्या सातबाराच्या उतारावर दाखवण्यात येईल असे शासन अध्यादेशात नमुद केले आहे. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे शेतकरी बांधवामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.