*महाराष्ट्र पञकार संघ अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक उत्साहात संप्पन्न*
*शनिशिंगणापूर येथे होणार पञकारांचे राज्यव्यापी अधिवेशन - राज्य अध्यक्ष- श्री विलास कोळेकर साहेब*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
*श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे महाराष्ट्र पञकार संघाची अहमदनगर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.यावेळी बैठकीस संघाचे राज्य अध्यक्ष श्री विलास कोळेकर हे उपस्थित होते. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला तर आगामी पञकार अधिवेशन शनिशिंगणापूर येथे घेण्याबाबद चर्चा करण्यात आली.धार्मिक तिर्थक्षेञ असलेल्या शनिशिंगणापूर येथे नोव्हेंबर मधे अधिवेशन होईल यासाठी तयारीला लागा असे राज्य अध्यक्ष कोळेकर यांनी सांगितले.या बैठकीस अहमदनगर जिल्हातील पञकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रसंगी अहमदनगर जिल्हाध्यक्ष दत्ताञय खेमनर यांनी या जिल्ह्यात अधिवेशन यशस्वी पार पडेल अशी ग्वाही देत महाराष्ट्र पञकार संघाच्या अहमदनगर जिल्ह्याच्या कार्याचा आढावा दिला. महाराष्ट्र पञकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीदास बैरागी यांनी शनिशिंगणापूर येथे अधिवेशन कसे व्हावे याची माहिती देऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शनिशिंगणापूर येथे पार पडलेल्या बैठकी प्रसंगी महाराष्ट्र पञकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीदास बैरागी ,उपाध्यक्ष रामनाथ जऱ्हाड ,जिल्हाध्यक्ष दत्ताञय खेमनर, उ.म.उपाध्यक्ष रंजनराव साळवी,जिल्हा उपाध्यक्ष अमोल राखपसरे, जिल्हा सचिव राजेंद्र बनकर , छायाचिञकार संघटना जिल्हाध्यक्ष किरण शेलार, जिल्हा संपादन प्रमुख साईप्रसाद कुंभकर्ण , जिल्हा संघटक राजेंद्र दुनबळे, हेमंत शेजवळ , राहुरी ता.अध्यक्ष राजेंद्र साळवे , गणेश भालेराव, आदीसह अहमदनगर जिल्ह्यातील पञकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर यांचा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला तर जिल्ह्यातील काही नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करुन त्यांना नियुक्तीपञ देण्यात आले*