अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)-विदयाविहार काँलनीतील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पिंताबर पाटील यांचे वडील पिंताबर भिका पाटील (६४) यांचे अल्पशा आजाराने दुख्खद निधन झाले. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते.त्यांच्या अचानक जाण्याने विदयाविहार काँलनीवर दुख्खाची कळा कोसळली.आपल्या आयुष्यात सामाजिक कार्याला महत्त्व दिले. त्यांच्या गोड स्वभावामुळे मित्र परीवारांचा गोतावळा मोठा होता.त्यांचे सामाजिक कार्य मुलगा रविंद्र पाटील हे करीत आहेत. काँलनीतील कोणताही प्रश्न असो तात्या लगेच मार्ग काढत समोरच्या व्यक्तीला धीर देत.त्यांच्या अचानक जाण्याने अमळनेर शहरावर दुख्ख कोसळले.
माजी आमदार साहेबराव पाटील म्हणाले कि पिंताबर तात्या अचानक गेल्याने आम्ही पोरके झालो.एक चांगला व्यक्ती गमवल्याचे दुख्ख आहे.संत गजानन महाराज त्यांच्या परीवाराला दुख्ख सहन करण्याची शक्ती देवो.त्यांच्या दुख्खात लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, नगरसेवक, कार्यकर्ते त्यांच्या मागे आहेत.
त्यांच्या मागे नगरसेविका पत्नी कमलबाई पाटील, भाऊ,मुलगा,सुन,नातवंडे असा परीवार आहे.