Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)-अमळनेर शहरात नगरपालीकेची सत्ता आल्यानंतर शहरातील रस्त्याचे भाग्य उजाळले आहे. शहरातील ररत्यांचे तिनतेरा वाजले होते.वाहनधारकांना गाडी चालविणे कठीण झाले होते .नगरपालीकेची सत्ता माजी आमदार व विकासाचे महामेरू कृषीभूषण साहेबराव पाटील ,लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व त्यांचे नगरसेवक यांनी कामाचा धडाका लावला आहे.

    अमळनेर शहरातील नागरिक, महीलांचे प्रश्न असो ते तात्काळ सोडविण्यासाठी माजी आमदार ऊन,वारा,पाऊस न पाहता सोडवण्यासाठी कटिबद्ध असतात. अमळनेर शहरातील अनेक बंद पडलेल्या कुपनलीका त्यांनी सुरू केल्याने शहरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात त्यांना यश आले आहे. शहरातील रस्ते डांबरीकरण झाल्याने शहराच्या विकासात भर पडली आहे. शिरूड भागातील महीला ररत्यांचे प्रश्न घेऊन आले त्याची तात्काळ दखल माजी आमदारांनी घेतली. महीलांनी त्यांचे आभार मानले म्हणाले कि आपण असे लोकप्रतिनिधी आहात कधीही कोणतेही कारण न सांगता प्रश्न तात्काळ सोडवतात .कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, गरीब असो श्रीमंत त्यांच्या प्रश्नांची तात्काळ दखल हा गुण अमळनेरकरांना आवडतो.

     अमळनेर येथील राजभवन मध्ये अनेक वयोवृद्ध येतात काहिकडे रेशनकार्ड, सेवाज्येष्ठता कार्ड नाही अशांना कागदपत्र घेऊन विक्रांत पाटील, रवींद्र पाटील मदतीला धावतात, वेळप्रसंगी भाड्यासाठी पैसे नसले तर स्वाताच्या खिशातून देतात. हे माजी आमदार पाटील यांचे भविष्यातील स्वप्न पुर्ण होतील अशी चर्घा सध्या अमळनेर मध्ये सुरू आहे.

     कोणतीही समस्या 

*मा.आ.कृषिभूषण साहेबरावदादा पाटील* यांनी काही दिवसापुर्वी शिरुड नाका भागातील महिलांच्या रस्त्याच्या समस्या तात्काळ सोडविल्याने अमळनेरच्या महिला व पुरूष मंडळी थेट साहेबरावदादांना भेटून चिंता व्यक्त करतात व *मा.आ.साहेबरावदादासुध्दा* ऊन्हाची तमा न करता थेट जनतेत जाऊन अमळनेरकरांची चिंता दुर करतात...

आज ओमशांती नगर व सप्तश्रुंगी काॅलनी भागात जनतेत जाऊन समस्या सोडवितांना *मा.आ.साहेबरावदादा पाटील* व नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारीवर्ग.....

जनतेचा खरा नायक .... *मा.आ.कृषिभूषण साहेबरावदादा* हेच आहेत असा अमळनेरकरांचा सुर ऐकायला मिळतोय....

    सध्या अमळनेर शहरातील विकासाचा धडाका माजी आमदार साहेबराव पाटील यांनी नागरीकांचे रस्ते, पाणी, विज,रेशनकार्ड, जेष्ट नागरिक कार्ड,शहरातील अतीक्रमण अशामुळे नागरीकांच्या हदयात स्थान निर्माण केले असून सर्वत्र शहरात त्यांच्या विकासकामाची चर्चा सुरू आहे.

फोटो

अमळनेर शहरातील नागरीकांचे प्रश्न सोडवतांना माजी आ.साहेबराव पाटील व नागरिक

छाया ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.