अमळनेर प्रतिनिधी-
गांधली-पिळोदे येथील बालाजी विद्यालयाचा निकाल 91.52%
--बालाजी विद्यालय गांधली पिळोदे च्या वतीने यावर्षी सन 2017-18 ला शालांत परीक्षेस 59 विद्यार्थी प्रविष्ट होते. यापैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .यापैकी 16विध्यार्थी Distinction मध्ये , 21 विद्यार्थी ग्रेड । व 17 विद्यार्थी ग्रेड ॥ मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विशेष लक्षणीय बाब ही की निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
विद्यालयातून कु. वैष्णवी प्रकाश पाटील 89.20% गुण प्राप्त करून प्रथम आली.द्वितीय कु. धन्वंतरी मधूकर पवार 86.80%, तृतीय कु. प्रेरणा राजेंद्र लिंगायत 86.40% चतुर्थ कु.कोमल सीताराम पाटील 85%गुण प्राप्त केले आहेत.
या सर्व दहावी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे व मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे स्कूल कमेटी चेअरमन श्री.गिरीश शिंंदे आणि सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
यासोबतच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री.एस. व्ही पाटील, पर्यवेक्षक ,शिक्षक आणि गावकरी आदींनी अभिनंदन केले आहे.