🤝🤝🤝🤝अमळनेर प्रतिनिधी-माळी समाजाने समाजाचे युवा नेते विलासराव पाटील यांच्या पाठीशी उभे राहावे व त्यांना आमदार होण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करावे असे नाशिक येथे शिक्षक मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून अ.भा.माळी समाजाचे जेष्ट मार्गदर्शक राजाभाऊ काठे बोलत होते.
यावेळी काशीनाथ माळी,अनिलजी सोनवणे, ईश्वर महाजन,अनिल महाजन,वासुदेव माळी,संजय खलाणे,जाधव सर,असंख्य माळी शिक्षक उपस्थित होते.
✊✊✊🤝🤝 सर्व समाज बांधवानो, आपल्या नाशिक शिक्षक मतदारसंघात अखिल भारतीय माळी महासंघाचे संस्थापक विश्वस्त, माळी कर्मचारी सेवा संघाचे प्रदशाध्यक्ष, आदरणीय विलासराव पाटील हे 2००६, 2०१2, व आता २०१८ मध्ये शिक्षक आमदार म्हणून उभे आहेत . मित्रांनो मतदारसंघ खुप मोठा आहे. त्यामुळेच प्रचाराची जबाबदारी आपल्या मार्फत राबवावी . असे वाटते. कारण असे की आज आपण सध्या कोणत्या न् कोणत्या पक्षामार्फत पदाधिकारी , नगरसेवक, सरपंच, उपसरपंच वा अन्य एखादया सन्माननीय पदावर काम किंवा निवड झालेली असेल. पण मित्रांनो आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो तेव्हा आपणांस कोणीतरी विरोध करतो. प्रस्थापित लोक तर आपल्या विरोधावर बसलेले असतात. आपणांस व समाजास जास्त प्रमाणात कोणत्या समाजाकडून विरोध होतो हे देखील माहित आहे. प्रशासकीय कामांमध्ये, शिक्षण विभागात देखील आम्हा सह आपणांस देखील या गोष्टीचा विरोध होतो. त्यासाठीच सरांनी उमेदवारी घोषित केलेली आहे. मित्रांनो आपण जेव्हा माळी महासंघात काम करतो,व्यासपीठावरून भाषणे बोलतो की समाज संघटन झाले पाहीजे, समाजाच्या माणसाला मदत केली पाहिजे, कोणत्याही निवडणुकीत त्यांना आपण मदत केली पाहिजे असे आपण आवर्जुन सांगतो. कधी कधी आपण वरील कृती करून काही समाज बांधव एकसंघ होवून कृती करतात व समाजबांधवास निवडून आणतात . हा अनुभव आपण समाजाच्या कार्यकमात सांगतो.
वरील गोष्टी सांगण्यामागचा हेतू माझा काही समाज बांधवास लक्षात आला असेल. या शिक्षक आमदाराच्या निवडकणुकीत सुध्दा आपल्याला एकजूट होण्याची गरज भासणार आहे. या निवडणुकीत सध्या एकाच समाजाचे १०ते ११ उमेदवार उभे आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होवून आपल्या उमेदवारास म्हणजे विलासराव पाटील ( माळी ) सरांना हे फायदयाचे होणार आहे. हे समीकरण लक्षात घेता माळी समाजाबरोबर इतर ओबीसी समाजाचे संबंध सलोखाचे असतात . ते माळी समाज बांधवास मोठा भाऊ मानतात अश्या समाज बांधव एकत्र करून त्यांची मदत घेणे अपेक्षित आहे. माझी आपणांस कळकळीची विनंती की, आपण कोणत्याही गावात, शहरात,पाड यांवर राहत असाल, आपल्या ओळखीचा शिक्षक असेल त्याला आपण विलासराव पाटील यांना प्रथम पसंत क्रमांक१ चे मत देणे ची विनंती करावी .जेणेकरून आपलाच समाज बंध निवडून येण्यास मदत होईल. व समाजबांधवचा प्रचार होईल. मला खात्री आहे की आपण समाजाचे देणे लागतो. नक्कीच समाजाच्या उमेदवाराचे समर्थन करून , संपर्क साधून , आपल्या परीचयातील शिक्षक व अन्य समाजातील, तसेच शिक्षक नातेवाईक,बाहेरगावातील, शिक्षक नातेवाईक व मित्रमंडळी यांना फोन करून विलासराव पाटिल सरांना निवडून आणण्यासाठी मदत करू, सहभागी होवू, व इतिहास घडविण्याचे खरे माळी समाज शिलेदार होवू हीच अपेक्षा. जय ज्योती ! जय क्रांती ! जय सगर राजा ! संतश्रेष्ठ सावता महाराज की जय !
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 एक माळी समाज बांधव