*अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आठवतात ते दिवस आजही कधीकाळी वृत्तपत्र (न्यूज पेपर) घरो घरी वाटायचो.... एक वेगळा आनंद*
*पावसात कॉलनी परिसरात सायकल वर उचलून चिखलात पायी चालणे आणि सायकल वरील पेपरची पिशवीतून पेपर काढणे खूप कठीण होते*
*पैसे नाहीत म्हणून ग्रामीण भागात सायकलीवर फिरणे वेगळा काळ होता*
पावसाळ्यातील दिवसाला सुरुवात झाली तर.. ते दिवस कधीही विसरता येत नाहीत आठवणी हृदयात आजही कायमस्वरूपी कोरल्या गेल्यात...25 वर्षापूर्वीची एक शाळकरी मुलाची कहाणी म्हणा किंवा त्याची धडपड...जून महिना आला की खूपच अडथळ्याची शर्येत असे...आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती पेपर वाटून सकाळची शाळा आणि पुढे काही वर्षांनी ज्युनियर कॉलेज पेपर वाटणे सुरूच... पाऊस असो किंवा थंडी-वादळ....तोच नित्यनियम असायचा पावसात पेपर वाटणे खूपच कठीण कॉलनी परिसरात पक्के रस्ते नव्हते सायकल चिखलात फसायची तीला वरती उचलून पुढे चालावे लागत असे. एके दिवशी माझेही नाव वृत्त पत्रात येईल हाच आत्मविश्वास मनी नेहमी होता.
बाल वयातच सामाजिक कार्येक्रमांना सहभाग पुढे स्वतःला झोकून दिलं कॉलेजला असतांना समाजाच्या गावांना जाण्यासाठी भाड्याला पैसे नसायचे म्हणून सायकलीवर फिरून भेटी देणे बैठका घेणं चालूच होतं खरंच शिक्षण करत असतांना आर्थिक बाजू भक्कम नसल्याने खूपच त्रास होता.आई इतरत्र काम करून आमची पोट भरायची आणि वडील हातमजुरी करायचे मे महिन्यांचे कडक ऊन पायात चप्पल नाही कोणी काही वस्तू दिल्यास ते आमच्यासाठी खाऊ म्हणून घरी आणने मुलाबाळांची काळजी करणारा बाप पाहून मी स्थब्द उभा राहायचो काहीतरी करायची जिद्ध स्वस्त बसू देत नसे परंतु आत्ता पैसे आणि सर्व सोयी असुनही काहीच करता येत नाही वेळ कमी असतो खरंच ते दिवस खुपचं चांगले होते असेच म्हणावे लागेल.
निवांत बसलो होतो म्हणून जून महिन्यातल्या आठवणींना उजाळा देऊ शकलो असो......जय ज्योती!
प्रवीण बी.महाजन
महात्मा फुले विचार मंच अमळनेर