Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी,

*वाकडी येथे मातंग समाजातील अल्पवयीन मुलांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध सामाजिक एल्गार*

अमळनेर:-जामनेर तालुक्यातील वाकडी येथे झालेल्या मातंग समाजातील अल्पवयीन मुलांवर झालेल्या अत्याचारविरुद्ध आज अमळनेर शहरातून विविध पुरोगामी सामाजिक, राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आपला निषेध नोंदविला.
या प्रकरणातील आरोपीविंरुद्ध जलद न्यायालयीन निर्णय देऊन  पीडितास न्याय द्यावा  अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे  करण्यात आली.
     संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी ही घटना जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडली.विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,बीजेपीचे बहुजन नेते एकनाथ खडसे यांच्या जिल्हयातील असून तसेच  राज्यातील दोन नंबरचे मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असून सुद्धा अश्या प्रकारचे निदनींय घटना घडत असल्यामुळे या विषयी संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध नोंदवला जात आहे.याच अनुषंगाने आज अमळनेर शहरातून विविध पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारींचे प्रतिनिधी आप्पा सोनवणे यांच्या द्वारे लेखी निवेदन देऊन निवेदनात आरोपींना कठोरात कठोर कार्यवाही करून पिडित कुटुंबास पोलीस संरक्षण देण्यात यावे, तसेच त्यांना योग्य ती शासकीय मदत लवकरात लवकर मिळवून द्यावी, संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जाती-जमातींमधील लोकांवर अन्याय होत असून अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी योग्य कायदा व सुव्यवस्था राबवण्याची जबाबदारी केंद्र व राज्य शासनाची आहे, हि बाब गंभीर असून योग्य  कार्यवाही न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे विनंती वजा इशारा देण्यात आला
   या प्रसंगी नगरसेवक नरेंद्र संदनशिव,अदिवासी पारधी महासंघाचे महिला प्रदेश अध्यक्ष प्रा.जयश्री साळुंके,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे प्रा.डॉ.विजय तूंटे,बहुजन मुक्ती पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.  विजय खैरनार तसेच तालुका अध्यक्ष संदीप सैंदाणे, बामसेफ चे कार्यकर्ते प्रा विजय गाढे ,आर पी आय कार्यकर्ते यशवंत बैसाणे ,पंचशील मंडळ चे अर्जुन संदनशिव, बाळा साहेब सोनवणे, ग्रामीण पत्रकार संघाचे सुनील करंदीकर, संजय मरसाळे, सुरेश कांबळे, सत्तार खान, गणेश चव्हाण, शिवाजी पारधी, जयवंत वानखेडे,
प्रवीण बैसाणे, सामाजिक कार्यकर्ते केतन सैंदाणे, डॉ राजीव कांबळे, प्रा भुसनर,सोमा कढरे, जयपाल गिरासे, रवी कढरे, समाधान सैंदाणे, उत्तम वानखेडे, सुखदेव जाधव, हरिश्चंद्र कढरे इ मोठ्या संख्येने सामाजीक कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.