Halloween party ideas 2015

*निवृत्तीनंतरही शाळा शुभारंभ दिनी मा.केंद्रप्रमुख भागवत अण्णांची उपस्थिती विद्यार्थी-शिक्षकांसह गावक-यानांही भावली......*
अमळनेर प्रतिनिधी-
       आज दि.15 /6/2018 रोजी जि.प.उच्च प्राथ.शाळा, पिंगळवाडे ता.अमळनेर येथे शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत इ.1 ली तील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन *शाळा शुभारंभ दिन* व सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते मोफत पुस्तक वितरण करुन *पुस्तक दिन* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
          पदविधर शिक्षक श्री.प्रविण पाटील सर यांच्या युवॉन कारला सर्व शिक्षक व विद्यार्थी मिळून सुंदर फुले, शो पट्टी व फुग्यांनी सजवून इ.1 ली च्या विद्यार्थ्यांना कारमधून संपुर्ण गावांतून बँड पथक व इतर वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीद्वारे वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण होऊन सजवलेल्या कारमधून सैर करण्याचा अनोखा आनंद मिळाला. पालकांनाही आपल्या पाल्यांची शाळेमार्फत केलेल्या हौसेची अप्रुप वाटून कौतुकाने आपल्या दारातून हात दाखवून आनंद व्यक्त केला.
         यावेळी शाळेत नव्याने रुजू झालेले शिक्षक श्री.दत्तात्रय सोनवणे, श्री.प्रविण पाटील व श्री.रविंद्र पाटील यांनी आपला परिचय देऊन शाळेच्या वैभवशाली वाटेवर अग्रेसर होण्याचा निर्धार केला. मुख्याध्यापिका श्रीम.वंदना ठेंग यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन नविन शै.वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नुकतेच दि.31 मे रोजी सेवानिवृत्त झालेले अमळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख अण्णासाहेब श्री.बी.ए.भागवत यांनी नवागतांचे स्वागत करुन वेळोवेळी उपस्थितीसह मार्गदर्शन करण्याची ग्वाही देऊन शाळेच्या वैभवात भर घालण्यासाठी शिक्षकांसह ग्रामस्थानांही साद घातली.
          याप्रसंगी शा.व्य.स. अध्यक्ष श्री.प्रभाकर पाटील, सदस्य श्री.राजेंद्र भिल ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी श्री.चंद्रकांत पाटील, श्री.धुडकू पाटील, श्री.रविंद्र देशमुख, श्री.विक्रम शेलार मुख्याध्यापिका श्रीम.वंदना ठेंग, उपशिक्षक श्री.दत्तात्रय सोनवणे, श्री.प्रविण पाटील, श्री.रविंद्र पाटील हे उपस्थित होते. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना शा.पो.आ.अंतर्गत मिष्टान्न भोजन देण्यात आले.
          सूत्रसंचलन श्री.रविंद्र पाटील यांनी केले व आभार श्री.दत्तात्रय सोनवणे यांनी मानले

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.