Halloween party ideas 2015

अखेर त्या सेवानिवृत्त शिक्षकांना न्याय मिळाला....
११५ शिक्षकांचा निवडश्रेणीचा  ८ वर्षाचा फरक मिळाल्याचा आनंद
१ कोटी ७५ लाख रुपये विशेष बाब म्हणून मंजूर
साईमत ने सतत पाठपुरावा केला त्यामुळे मानले आभार
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचारी ११५ कर्मचारी वर्गाची ८ वर्षांपासून निवडश्रेणीचा फरकापासून वंचीत अशा आशयाचे वृत्त दैनिक साईमतने वेळोवळी छापून शासनाच्या निर्दशनास आणून दिले.संभाजी ब्रीग्रेडचे तालुकाध्यक्ष अनंत निकम व सदस्य यांनी उपोषणाचे हत्यार उगारल्यामुळे शेवटी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना दखल घ्यावी लागली
        अमळनेर तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचारी यांना आपल्या आजारपणासाठी हक्काचा पैसा मिळवण्यासाठी प्रशासन अधिकारी वरिष्ठ अधिकारी विदयामान आमदार, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी, यांना निवेदन देऊनही कोणतीही दखल घेतली नाही या फरकासाठी काही अधिकारी पैशाची मागणी करत असल्याने हे प्रकरण धुळखात पडले होते.दैनिक साईमत यांनी सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाचे प्रश्न समजून घेऊन दिनांक २७ आँगष्ट २०१७ ला प्रकाशित केले.नंतर अजुन बातमीचा मागोवा घेऊन प्रसिद्ध केले.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एप्रिल २००४ पासून प्रत्यक्ष निवडीचा लाभ मिळत आहे.परंतू १ एप्रिल २००४ ते ३१ मार्च २०१२ या फरकाचा बील बाकी होते.कर्मचारी वर्गाला आपल्या आजारपणासाठी पैसा उपलब्ध होत नाही, काही दवाखान्यात आहेत, तर काही फरक आज ना उद्या मिळेल या आशेवर जीवन जगत आहेत यातुन काही शिक्षक परगावी मुलाजवळ आहेत, काहीचे निधन झाले तर काही वयोवृद्ध आहेत.त्यांनी सतत शासनाला कागदपत्राद्वारा पाठपुरावा केला.कधीकधी संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून उपोषणाचे हत्यार उपसले शेवटी शासनाला जाग आली.सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाला २०१२ पासून ११५  कर्मचारी वर्गाचे फरक दया यासाठी संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष अनंत निकम  यांनी २६ जानेवारी  २०१८ पासुन उपोषणाचा इशारा दिला. लागलीच शासनाने दखल घेऊन दिनांक १७/१/२०१८ ला शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी ११५  सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाचे 1,75,00,000  (अक्षरी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मात्र) सदरची  रक्कम खास बाब म्हणून मंजुरीचे पत्र मिळाल्याने लाक्षणिक उपोषण रद्द करण्यात आले.सेवानिवृत्त कर्मचारी वर्ग व त्याच्या कुंढुबाला आपल्या हक्काचे पैसे मंजुरी झाल्यामुळे लोकप्रतिनिधीचे,प्रशासन अधिकारी, शिक्षण संचालक, उपसंचालक, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अनंत निकम,शिक्षणसभापती नितीन निळे,उपसभापती चेतन राजपुत यांचे व दैनिक साईमतचे संपादक, व अमळनेर प्रतिनिधी यांचे आभार मानले.
  
चौकट
सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाचे  ११५ जन आठ वर्षांपासून फरकापासून वंचित होते.याबाबत सतत पाठपुरावा लोकप्रतिनिधी, व अधिकारी वर्गाला करीत राहीलो,साईमत वृत्तपत्राच्या माध्यमातून आमच्या समस्या  शासनाच्या निर्दशनास आणून आज आम्हांला न्याय मिळाला.आम्ही आज आम्हास ज्यांनी मदत केली सर्वाचे आभार मानतो.
  गं .का.सोनवणे
सेवानिवृत्त शिक्षक
अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.