Halloween party ideas 2015


सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
अमळनेर प्रतिनिधी-सानेगुरुजी प्राथमिक शाळेतील उपक्रमशिल शिक्षक मनोहर पाटील  यांची मुलगी कु. अनुज्ञा मनोहर पाटील हिने तब्येतीशी अतिशय संघर्ष करत ८७% गुणाचा मोठा टप्पा गाठला म्हणून तिचे अभिनंदन व कौतुक करण्यासाठी व तिचा उत्साह वाढवण्यासाठी साने गुरुजी कन्या हायस्कुलच्या मुख्याध्यापिका आदरणीय अनिता  बोरसे मॅडम,   विलास चौधरी सर, ज्येष्ठ शिक्षिका मा.वर्षा पाटील मॅडम,   मनिष उघडे सर व मुकेश पाटील सर ह्यांनी माझ्या घरी भेट देऊन आमच्या कुटुंबाचा उत्साह वाढवला व पालक व अनुज्ञाचा सत्कार केला. त्या सत्काराने पालक भारावले. आज आमच्या शाळेतील मुख्याध्यापीका व शिक्षक ,घरी येऊन सत्कार करतात माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत असे सांगितले.
    मुख्याध्यापीका अनिता बोरसे यांनी अनुज्ञा  पाटील हिला भावीवाटचालीस शुभेच्छा देऊन मोठी अधिकारी हो असे सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.