आ शिरीष चौधरी यांचे केंद्रीय जलसंपदा मंत्री ना गडकरींना साकडे,मंत्र्यांची सकारात्मक शिफारस
अमळनेर प्रतिनिधी-
अमळनेर गेल्या 20 वर्षांपासून निधी अभावी रखडलेल्या निम्न तापी पाडळसे प्रकल्पास प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना अथवा केंद्राच्या कोणत्याही योजनेतून निधी द्यावा तसेच सदर प्रकल्पास केंद्र शासनाच्या टी ए सी ची मान्यता त्वरित द्यावी अशी आग्रही मागणी आ शिरीष चौधरी यांनी केंद्रीय जलसंपदा तथा नदीविकास प्रकल्प मंत्री ना नितीन गडकरी यांची दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन केली.गडकरींनी देखील यास सकारात्मक शिफारस देत संबधित विभागास तातडीने लेखी आदेश देखील केले.
यावेळी आ चौधरी यांनी लेखी पत्र मंत्र्यांना सुपूर्द केले.यात नमूद केले आहे की निम्न तापी प्रकल्प 20 वर्षा पासून रखडलेला असून 25 टक्के काम झालेले आहे.हा प्रकल्प पूर्ण झाल्यास परिसरातील 25657 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.अमळनेर तालुक्यातील 19805 हेक्टर हा सतत दुष्काळ ग्रस्त भाग येतो.विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर हि शेतजमीन सतत ओलिताखाली येईल. दि 8 मार्च 2018 रोजी राज्य वित्त विभागाने निम्न तापी प्रकल्पास 2357.56 कोटी निधीस मान्यताही दिलेली आहे. किमान त्या आधारावर मंत्री महोदयांनी वरील बांबीचा विचार करुन केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना किंवा अन्य केंद्रीय योजनेतून सदर प्रकल्पास निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आमदार शिरीष चौधरी यांनी केली.यावर ना गडकरी यांनी सदर पत्रावर केंद्रीय जल आयोगाला चर्चा करून मदत करावी असे लेखी स्वरुपाचा सकारात्मक शेरा देऊन केंद्र शासन या धारणाबाबत सकारात्मकच आहे असे नमूद केले.
दरम्यान पाडळसे धरण पूर्ण व्हावे यासाठी आ शिरीष चौधरी हे सुरवातीपासून प्रयत्नशील असून निधीसाठी केंद्र व राज्य शासनाकडे सतत् काहींनाकाही पाठपुरावा ते करीत आलेले आहेत.त्यांच्या पाठपुराव्यामुळेच राज्य शासनाने या प्रकल्पाचे काम सुरु राहण्याकरिता प्रधान्यपूर्वक वेळीवेळी निधी उपलब्द करून दिला आहे.एवढेच नव्हे तर आ चौधरी यांच्या प्रयत्नांमुळेच राज्य वित्त विभागाने या प्रकल्पास 2357.56 कोटी निधीस मान्यता दिली आहे.त्यांच्या या सततच्या प्रयत्नामुळे या धरणास एकरकमी मोठा निधी मिळेल अशी आशा जनतेला असून शासनाने जनतेची हि रास्त अपेक्षा पूर्ण करावी अशी मागणी होत आहे.