सर्वत्र अभिनंदन
अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)-आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक व्यक्ती पैसै कमविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून तो कमवीत असतो.काही माणसे प्रामाणिकपणाने आपले जीवन जगत असतात. वास्तविक एसटी कर्मचारी वर्गाला मेहनत जास्त पण शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पगार कमी आहे. तरी कमी पगार जरी असला तरी प्रामणिकपणे इमाने इतबारे नोकरी करीत असतो.प्रवाशांचे कधी बँग ,कधी इतर वस्तू राहीली तो प्रामाणिकपणे प्रवाशाला परत करतो.असाच एक प्रकार अमळनेर आगारात घडला.
अमळनेर आगारातील चालक एकनाथ पाटील आणि वाहक विजय पाटील यांना शिरपुर ते अमळनेर बस क्रमांक 9102 वर डिव्टी करीत असतांना त्यांना 70000 हजार रूपये किमतीचे सोन्याची बँग डेपोत जमा केली. काही वेळेत ज्यांची बँग होती ते तपास करत डेपोत आले आणि त्यांची बँग त्या महीलेच्या ताब्यात दिली. त्या महीलेने वाहन चालक व वाहकांच्या प्रामाणिकपणाचे अभिनंदन केले.आजच्या स्पर्धेच्या युगात प्रामाणिक जिवंत आहे याची प्रचिती आली.अमळनेर आगाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.