Halloween party ideas 2015

राजपुत समाज बांधवांसह महाराणा प्रताप प्रेमींना उपस्थितीचे आवाहन

अमळनेर--हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त अमळनेर शहर व तालुका राजपूत एकता मंच च्या वतीने शनिवार दि 16 जून रोजी अमळनेर शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
             शोभयात्रेचे हे तिसरे वर्ष असून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.विश्राम गृहाजवळील महाराणा प्रताप चौक येथून सायं 5 वा शोभयात्रेस प्रारंभ होणार आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती राजपूत समाजाचे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी,सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी,सामाजिक संस्थांचे पदाधिकारी ,ग्रामीण पदाधिकारी आदींची  लाभणार आहे.सदर शोभायात्रा महाराणा प्रताप चौकातून मंगलमूर्ती पतपेढी,स्टेशन रोड,नगरपरिषद,सुभाष चौक,पन्नालाल चौक,बस स्टॅंड मार्गे पुन्हा महाराणा प्रताप चौकात समारोप होईल.मोठ्या उत्साहात आणि थाटात हि शोभायात्रा निघणार असून यात महिला भगिणींचीही मोठया प्रमाणात उपस्थिती राहणार आहे.तरी शहर व तालुक्यातील सर्व राजपूत समाज बांधव,महाराणा प्रताप प्रेमी तसेच महिला व युवकांनी मोठया संख्येने उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अमळनेर शहर व तालुका राजपूत एकता मंच च्या वतीने करण्यात आले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.