Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी-सध्याच्या युग स्पर्धेचे आहे.काळानुसार बदल स्विकारण्याची तयारी ठेवा,

ज्यांच्या जवळ नवनविन कल्पना जगासमोर मांडण्याची क्षमता आहे त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.बदलत्या तंत्रज्ञानास आत्मसात करण्याची क्षमता विकसित करा"असे प्रतिपादन प्रा.अशोक पवार यांनी  जी.एस.हायस्कुल यथे संपन्न झालेल्या रोबोटिक्स अँड ड्रोन तंत्रज्ञान ओळख कार्यशाळेत केले.

                 अमळनेरातील तरुण, जिज्ञासू,क्रियाशील व सृजनशील युवक,विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोबोट व ड्रोन तंत्रज्ञान ओळख कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे संचालक उदय पाटिल यांनी यावेळी सांगितले. आय.जी.एम. कॉम्पुटर चे संचालक रावसाहेब पाटिल यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपात सादर केलेल्या प्रेझेंटेशनने ओळख करून  दिली.'उज्वल संधींचे भविष्याचे आधुनिक दालन अमळनेर शहरात उभे झाले असून विद्यार्थ्यांनी,सृजनशील युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुत्रसंचालनातून रणजित शिंदे यांनी केले.एस.के.ऑफसेट चे संचालक मनीष बडगुजर यांनी टेक्निकल डेमो सादर करीत आभार मानले.यावेळी कृ. उ.बा. संचालक पद्माकर गोसावी,अजय केले,महेंद्र पाटिल,कन्हैयालाल बडगुजर आदिंसह पालक ही उपस्थित होते.

फोटो

अमळनेर जी.एस.हायस्कूल मध्ये कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना संचालक उदय पाटील, सोबत प्रा अशोक पवार, मुख्याध्यापक रणजित शिंदे व मान्यवर

छाया -ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.