अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन) सध्या मे महीना व कमालीचे तापमान वाढल्याने पाण्यासाठी प्राणी इकडेतिकडे फिरतांना दिसतात.अशावेळी एक गाव प्रसुती होण्यासाठी इकडेतिकडे फिरत असल्याचे दिसतात क्षणाचा विचार न करता सानेगुरुजी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी जवळच असलेले सानेगुरुजी शिक्षक पतपेढीचे संचालक आर.एस.पाटील सरांच्या मदतीने गायीची योग्य प्रसुती करूण वासराची कुत्रापासून संरक्षण केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अशोक रत्न कॉलॉनीत 20 रोजी सकाळी साडे पाच वाजेपासून एक बेवारस गाय वासराचा पाय बाहेर आलेल्या अवस्थेत विव्हळत होती दुपारी साडे अकरा वाजेपर्यंत कोणीच गायिकडे लक्ष देत नव्हते उन्हाच्या तडाख्याने गाय खाली कोसळली सानेगुरुजी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी मंगरुळचे कै आंबरदादा राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र श्रीराम पाटील यांना बोलावले राजेंद्र पाटील हे शेतकरी देखील असल्याने त्यांनी सुधाकर साळुंखे यांच्या मदतीने तात्काळ गायीच्या अंगावर सावलीसाठी ताडपत्री बांधून स्वतः तिला प्रसूत केले आणखी काही वेळ जर कोणी लक्ष दिले नसते तर गाय आणि वासरू दोन्ही मेले असते आणि कुत्र्यानी लचके तोडले असते त्यानंतर अनिता बोरसे यांनी एखाद्या प्रसूत महिले प्रमाणे तिची काळजी घेत तिला शिजवलेले हरभरा गूळ खाऊ घातला आनि तीन तास तिच्या वासराला कुत्रे खाऊ नये म्हणून पहारा ठेवला त्यांनतर सप्तशृंगी कॉलॉनीतील गायीचा मालक आला आणि तिला घेऊन गेला गायीची सुखरूप प्रसूती करून तिचा व वासराचा जीव वाचवल्याबद्दल शिक्षकांचे कौतुक होत आहे मात्र गायी पाळून निव्वळ चाऱ्यासाठी त्यांना मोकाट सोडणाऱ्या मालकांबद्दल मात्र नाराजी व्यक्त होत आहे शक्य नसेल तर गायी गोशाळेत पाठवा मात्र त्यांना बेवारस सोडू नका असे नागरिकांचे म्हणने आहे
त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.