अमळनेर प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बोंडअळीग्रस्त शेतकर्यांच्या बागायती कापसाला बागायतीप्रमाणे अनुदान मिळावे व जिरायती क्षेत्रावर जिरायती असे अनुदान प्राप्त व्हावे व अन्याय दुर करावा असे निवेदन आज तहसीलदार श्री.प्रदीप पाटील यांना देण्यात आले.*
बोंड अळी नुकसान भरपाईसाठी कोरडवाहू अनुदान फक्त ६ हजार रुपये आहे तर बागायती अनुदान १३००० आहे मात्र पंचानाम्यावर केवळ कपाशी असे दाखवून मात्र सरसकट कापूस पिक कोरडवाहू दाखविले गेल्याने तालुक्यात ज्या शेतकर्यांनी मे महिन्यात लागवड केली होती. त्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.
अमळनेर तालुक्यात ८ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड केली जाते. त्यानुसार सातबारा उताऱ्यावर विहिरीची नोंद असेल अशा शेतकर्यांना देखील सरसकट मध्ये तलाठी वर्गाने गणले आहे. यामुळे या अनुदानापासून हे शेतकरी वंचित राहणार आहेत. असे १६ हजार क्षेत्र १५ जून पर्यंत जून लागवड झाली आहे. यामुळे हे सर्व १६ हजार शेतकरी कृषी विभागाच्या अहवालानुसार या अनुदानाला पात्र असतानाही जिरायती अनुदान घावे लागणार आहे. यामुळे तब्बल शेतकर्यांचे १ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादीचे विधानसभाक्षेत्र प्रमुख भागवत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील,काँग्रेस (आय) तालुकाध्यक्ष गोकुळ नामदेव बोरसे, राष्ट्रवादीचे सुरेश पाटील, शिवाजीराव पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटिक, अनिल सिसोदे, डॉ. अशोक पाटील, विजय प्रभाकर पाटील, रामकृष्ण पाटील, रणजित भिमसिंग पाटील, संजय पुनाजी पाटील, विनोद कदम, पं.स.सदस्य विनोद जाधव, निवृत्ती बागुल, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर देसले, संजय पाटील, संभाजी पाटील, इम्रान खाटीक, सुभाष पाटील, मनोहर पाटील, महेश पाटील, गौरव पाटील, भुषण पाटील, सुनील शिंपी, कल्पेश गुजराथी, निलेश देशमुख कॉंग्रेसचे मनोज पाटील, सुभाष पाटील, पराग पाटील, धनगर पाटील, एड गिरीश पाटील, संभाजी पाटील, भागवत सूर्यवंशी, प्रविण जैन, अलीम मुजावर, श्रीकृष्ण पाटील. प्रकाश पाटील, जयवंत सिसोदे, किशोर पाटील, पी.के.पाटील, सीताराम पाटील, सुरेश पाटील दिनेश पाटील, संभाजी ब्रिगेडचे अनंत निकम, माजी जि.प.सदस्य शिवाजी पाटील आदि शेतकरी यावेळी उपस्थित होते.
फोटो
बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दया तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देतांना अनंत निकम,भागवत पाटील, सचीन पाटील, सुरेश पाटील, शिवाजी पाटील, अनिल शिसोदे, निवृत्ती बागुल व विविध पक्षाचे पदाधिकारी
छाया-ईश्वर महाजन अमळनेर