*लाखोंचा पोशिंदाला जीवन असहय झाले.
*शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)-अमळनेर तालुक्यातील देवगांव देवळी हे दोन हजार लोकवस्तीचे गांव असून हे गाव निंबू व आळूचे पाने,गवती चहा साठी प्रसिद्ध होते परंतु तिन वर्षांपासून सततच्या दुष्काळी परीस्थितीमुळे शेतातील बागा कोरडी झाल्या. शेतकरी कर्जबाजारी झाला. ज्या बागा नष्ट झाल्याने शेतकरी बांधवाना संसाराचे रहाटगाडगे
चालविणे कठीण झाले. आपल्या उपजीविकेचे साधन नसल्याने बाहेरगावी जो व्यवसाय मिळाला त्याच्यावर गुजाराण करण्याची वेळ आली.देवळी गावात निंबुच्या बागा पाण्याअभावी झाडे कोरडी झाली. ज्या झाडांना पोटच्या मुलाप्रमाणे वाढवली आणि ऐन फळे येण्याच्या कालावधीत कोरडी झाल्याने अनेक शेतकरी निराश होऊन कर्जबाजारी होऊन लाखो रूपायाचे नुकसान झाले.निसर्गाच्या तिन वर्षाच्या दुष्काळामुळे मुलीचे लग्न कसे करावे ,मुलांचे शिक्षण,आजारपण यामुळे शेतकरी बांधव दुहेरी संकटात सापडला आहे.शासनाने ज्याच्या बागा पाण्याअभावी कोरड्या झाल्या अशांना विशेष मदत केली पाहिजे अशी शेतकरी बांधवानी मागणी केली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागते. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
वरूणराजाने अवकृपा केली...टँकरचे दर परवडेनासे झाले....परिणामी निंबुच्या बाग जळून खाक झाली. जे काही पीक आले, त्यालाही व्यापाऱ्याने भाव दिला नाही. बँकेचे कर्जाचे पैसे न भरल्यामुळे सातबाऱ्यावर बँकेचे नाव चढले. यामुळे कर्जाचा डोंगर कसा दूर करायचा, दैनंदिन खर्च कसा भागवायचा याचे आव्हान उभे ठाकलेल्या अनेक शेतकरी कर्जाची परतफेड करण्यासाठी पै अन् पै जोडण्यासाठी दुय्यम व्यवसाय करीत आहेत.
लाखोंचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर कोणते अस्मानी संकट कोसळले आहे, याचे निंबा गजमल देशमुख, संभाजी अभिमन पाटील बापू साहेबराव पाटील, विश्वास हिंमतराव पाटील, माधवराव पाटील, सुकदेव अमृत पाटील अशा अनेक शेतकरी बांधवांचे शंभरापासून ते दोनशे झाडे पाण्याचा अभावी जळून खाक झाली.
हि एक उदाहरण आहे यांचे तीन एकरांचे शेत आहेत. तेथे त्यांनी चार वर्षांपूर्वी निंबुची बाग पिकवण्यास सुरुवात केली. विविध बँकांचे कर्ज घेतले. पहिली दोन वर्षे फळ येत नसल्याने उत्पन्न मिळाले नाही. गेल्या वर्षी पावसाच्या अवकृपेमुळे विहीरीचेही पाणीही आटले. टँकरचा आठवड्याचा सुमारे १५ हजार रुपयांचा खर्च न परवडणारा. त्यामुळे बाग जळून गेली.