अमळनेर प्रतिनिधी
या निवेदनाद्वारे साने गुरुजी उपसा सिंचन योजनेचे सर्व पीडित शेतकरी बंधू यांनी विनंती केली आहे की ही योजना सुरू होण्यासाठी संबंधितांना सहा-सात वर्षांपासून ते आजपर्यंत कित्येक वेळा निवेदने देऊन व पाठपुरावा करून प्रत्यक्ष भेटून या योजनेच्या दुःखाची करुण कहाणी सांगत आहोत. याच अनुषंगाने सर्व पीडित शेतकऱ्यांनी दिनांक 20 11 2017 ह्या दिवशी गिरीश महाजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या योजनेचे दुःख मांडले तेव्हा त्यांनी ताबडतोब ही योजना मंजूर करून टाकतो असे सांगितले परंतु प्रत्यक्षात मात्र झाले नाही त्यानंतर दुसऱ्यांदा 1८-१- 201८ रोजी अमळनेर येथील मार्केटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटीतही हेच उत्तर मिळाले. मात्र आश्वासनानंतर पाच-सहा महिने उलटून गेल्यानंतरही व बजेट जाहीर झाल्यानंतरही या योजनेसाठी एक छदामही मिळालेला नाही व या योजनेचे कामही सुरू झालेले नाही. शेतकरी मात्र अनेक बाळाप्रमाणे प्रत्येक वेळी भेटून विनवण्या करीत आहेत परंतु आमचे अश्रू कोणालाही दिसत नाहीत अशी त्यांची भावना आहे.
तसेच या निवेदनात असेही म्हटले आहे की जर यंदा पावसाळ्यापूर्वी या योजनेला निधी मिळून काम सुरू झाले नाही तर अजून दोन वर्ष ही योजना दुरुस्त होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांची महत्वाची दोन वर्षे व ह्या दोन वर्षांतील उत्पन्न वाया जाणार आहे. तसेच ही योजना कधी सुरू होईल व सुरू होईल होणार की नाही असे स्पष्ट सांगावे अशी ही संतापजनक भावना या निवेदनात व्यक्त केले आहे.
फोटो
शेतकरी मंडळीच्या सह्या आहेत दिलीप पाटील, मारवड, युवराज पाटील,बोहरा ,(साने गुरुजी उपसा योजना चेअरमन) निंबा पाटील मारवड(व्हा चेअरमन साने गुरुजी उपसा योजना) शिवाजी पाटील बोहरा साने गुरुजी उपसा योजना संचालक मधुकर पाटील संचालक साने गुरुजी उपसा योजना देवीदास पाटील, आसाराम धनगर बोहरा, विवेक विंचूरकर, भीमराव पाटील
(छाया ईश्वर महाजन अमळनेर)