Halloween party ideas 2015

*1 कोटी 64 लाख निधीतून होणार बंधाऱ्यांचे निर्माण*

अमळनेर - जलयुक्त शिवार योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघातील 5 सिमेंट बंधाऱ्यांसाठी 1कोटी 64 लाख निधीस मंजूरीं मिळाली असल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली आहे. सदरील 5 बंधाऱ्यामुळे परिसरातील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
            मतदार संघातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या कामासाठी जलयुक्त शिवार योजनेचे अध्यक्ष या नात्याने आमदार चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने  पाठपुरावा केला होता.यासंदर्भात आ चौधरी यांनी फाफोरे येथे ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर लागलीच मुंबई गाठून मुख्यमंत्री यांचेशी चर्चा केली.मुख्यमंत्र्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना निधी मंजूर करण्याचे आदेश देऊन, बंधारे मंजूर करून आणले.

*असे होणार पाच सिमेंट बंधारे*

            बोरी नदीवर
1)फाफोरे येथे 84 लाख 14 हजार,
2)जैतपीर येथे माळण नदीवर 17 लाख 88 हजार,
3)जैतपिर येथेच झाडी नाला 14 लाख35 हजार,
4)धानोरा येथे  22 लाख 15 हजार, व
5)धानोरा येथेच  25 लाख 78 हजार या प्रमाणे 5 बंधारे होणार आहेत.या कामासाठी एकूण 1 कोटी 64 लाख 30 हजार निधीस तांत्रिक  मंजुरीसह प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
            दरम्यान दिनांक 13 एप्रिल 2018 रोजी  जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठकीस जलयुक्त शिवार योजनेसंदर्भात झालेल्या बैठकीत आ चौधरी यांनी सन 2015-16, 2016-17 आणि 2017-18 या वर्षाचा निधी व केलेल्या पत्रव्यवहाराबाबत त्यानी दिलेल्या चौकशी पत्राचा विचार करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती,यावर त्यांनी या कामांसाठी निधी देण्याचे अश्वासन दिले होते. याव्यतिरिक्त आमदार चौधरी यांनी परिसराची पाहणी करून शेती सिंचनाला प्राधान्य देत बंधारा बांधण्यासाठीचा  प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला होता.फाफोरे येथे आ चौधरींनी ग्रामस्थांची भेट घेऊन लवकरच बंधारा मंजूर करून पूर्णत्वास आणेल तसेच भिलाली बंधाऱ्यासाठी सुधारित प्रशासकिय मान्यतेसह वाढीव निधी मिळवुन बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास आणण्याची  ग्वाही दिली होती.
            मंजूर झालेल्या या पाच बंधाऱ्यांची लवकरच  इ निविदा निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.भविष्याची मोठी जल तरतूद करणाऱ्या या कामास मंजुरी मिळविल्याने आ शिरीष चौधरी यांचे परिसरातील शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.याव्यतिरिक्त मतदार संघात शिरसोदे व खळेश्वर बंधाराचे काम प्रगतीपथावर असून व अजून इतर बंधारे मंजुरीसाठी  प्रस्तावित असल्याची माहिती आ चौधरींनी दिली आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.