मित्र परीवारांचा अभिनंदनाचा वर्षाव.
अमळनेर प्रतिनिधी- ईश्वर महाजन) क्रिडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी धुळे यांचा वतीने दिला जाणारा जिल्हा युवा पुरस्कार त्यांच्या संस्थैला म्हसाले ता.साक्री येथील नेहरु युवा संस्थेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पोलीस कवायत मैदान धुळे येथे ग्रामविकास व जलसंधारण राज्य मंत्री तथा धुळयांचे पालकमंत्री दादा भुसे ,युवा केद्राचे जिल्हा समन्वयक अतुल निकम, डॉ सतीश पाटील(आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प संचालक यशदा पुणे),जिल्हा क्रीडा अधिकारी सब्निस,नंदकुमार बेडसे यांच्या हस्ते राजेंद्र माळी,सुविद्य पत्नी रत्ना माळी,यांना सन्मानपत्र,व स्मृतीचिन्ह ,शाल देऊन सत्कार करण्यात आला.
राजेंद्र माळी हे गेल्या काही वर्षापासुन पर्यावरण स्वच्छता सप्ताह युवा सप्ताह झाडे लावा झाडे जगवा वनराई बंधारे सामाजिक तम्बाकू मुक्त शाळा अभियान ऊर्जा बचत लोककला जतन युवा विकास कपड़े वाटप इ.कामे करीत असल्याने हा पुरस्कार मिळाला. त्यांच्या यशाचे अभिनंदन ओबीसी शिक्षक असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विलासराव पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष काशिनाथ माळी,आर.पी.सैदाणे,कैलास माळी,किशोर माळी,न्हानू माळी,ईश्वर महाजन,संजय खलाणे, रूपेश कुलकर्णी, सतीश वैष्णव, व्हि.आर.महाजन,सौ वसुंधरा लांडगे यांनी केले
फोटो
पालकमंत्री भुसे व मान्यवर सन्मान पत्र देऊन राजेंद्र माळी व पत्नी रत्ना माळी यांना पुरस्कार देऊन सत्कार करतांना
छाया ईश्वर महाजन अमळनेर