अमळनेर प्रतिनिधी-
ओ बी सी नेते छगन भुजबळ यांच्या जामिनामुळे अमळनेर तालुक्यात जल्लोष,फटाक्यांची आतिषबाजी,घोषणा देत केला आनंद व्यक्त
महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मार्च २०१६ पासून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ,अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ,माळी समाजाचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला.छगन भुजबळ यांनी गुरुवारी त्यांच्या अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयानं त्यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. या पाश्वभूमिवर अमळनेर येथील विश्र्हाम गृहात छगन भुजबळ यांच्या सुटके समर्थनार्थ तालुक्यातील माळी समाज बांधवानी यावेळी जलोष करीत आंनद व्यक्त केला. याप्रसंगी माजी नगरसेवक बाळासाहेब महाजन,समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस बाबुलाल पाटील,ओ.बी.सी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दिनेश माळी,,अँड.सुरेश सोनवणे, माळी महासंघ युवक जिल्हाअध्यक्ष प्रा.हिरालाल पाटील, माळी महासंघाचे विभागीय कार्याअध्यक्ष भिमराव महाजन,माळी महासंघ तालुकाध्यक्ष अमोल माळी,नगरसेवक देवीदास महाजन,माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, सामाजिक कार्यकर्ते दशरथ लांडगे, रणजीत शिंदे, पंकज चौधरी, माळी महासंघ जिल्हा चिटणीस प्रा.नितिन चव्हाण जाकीर शेख पठान , बीड येथील रणजीत पाटील, डी. ए. सोनवणे, धंनजय महाजन, डांगरी येथील सरपंच अनिल शिसोदे , अरुण शिंदे,पत्रकार राजेंद्र पोतदार, जितू ठाकुर, जितेंद्र पाटील, धनुभाऊ महाजन आदी बहुजन समाज बांधवानी फटाके फोडीत जल्लोष व्यक्त केला.