अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मधल्या शिवाजी बगीचा परिसरात मध्यरात्री बोहरी पेट्रोल पंपाचे संचालक अलीअजगर बोहरी उर्फ बाबा बोहरी (वय-५०) यांची मरेकऱ्यांकडून जवळून बंदूकीतून गोळी झाडून हत्या करण्यात आली. बोहरी हे पायी चालत घरी जाताना त्यांच्यावर हा गोळीबार झाला. अचानक झालेल्या या गोळीबारात बाबा बोहरी रक्ताच्या थारोळ्यात पडले. सर्व ताकद एकटवून ते पुन्हा पेट्रोलपंपावर आले. यावेळी रक्तबंबाळ झालेल्या मालकाला पाहून पंपावरील नोकरही घाबरले. बाबाशेठ यांनी पिण्यासाठी पाणी मागितले आणि ते खाली कोसळले. दरम्यान, जखमी बाबाशेठ यांना रूग्णालयात दाखल केले असता उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याच डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्यावर गोळी कुणी झडली? यामागचं कारण काय ? याचा तपास आता अमळनेर पोलिसांकडून सुरु आहे.
सध्या तरी अमळनेर शहरात लोकामध्ये तणावाचे वातावरण असून डि.वाय एस.पी शेख, पोलीस निरीक्षक बडगुजर यांच्या पुढे एक आवाहन आहे .लवकरच ते गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतील हे निश्चित.. अशी चर्चा अमळनेर शहरात सुरू आहे.