ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी केली परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी व उशीरा कर्जमाफीमुळे सर्वसामान्य शिक्षण शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेल्या विकासाचे स्वप्न व अच्छे दिनाच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत अशी चर्चा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
सविस्तर माहिती अशी कि विश्वासराव शामराव पाटील (५८)राहणार गडखांब ता.अमळनेर यांच्याकडे २ हेक्टर ३६ आर कोरडवाहू शेती शेती आहे.शासनाने त्यांना ७५००० हजार रूपयाची कर्जमाफी दिली.परंतु शासनाच्या कर्जमाफी योजनेला उशीर झाल्याने व्याजाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.सदर कर्जमाफी आठ महीने उशीरा झाल्याने ११००० हजार रूपये व्याज भरल्याशिवाय जिल्हा बँकेचे कर्मचारी नवीन सोसायटीचे कर्ज देण्यास तयार नाही. शासनाला शेतकऱ्यांना कर्जमाफी दयावयाची होतीच एवढा उशीर का?व्याजाचा भुर्दंड कोण भरेल? बँकेचे कर्मचारी उर्मटपणे वागतात, यामुळे शेतकरी वैतागला आहे.हेच का ते अच्छे दिन?असा प्रश्न ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पडला आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे शासनाने कर्जमाफी दिल्यानंतर नवीन कर्ज दयावे. कर्जमाफी योजनेला शासनाकडून उशीर झाल्याने व्याज वसुली करू नये अशी मागणी शेतकरी बांधवानी केली आहे.