Halloween party ideas 2015

वार्ता पत्र (ईश्वर महाजन अमळनेर प्रतिनिधी 9860352960)

अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)-महाराष्ट्र राज्य विधान परीषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जुलै महिन्यात येऊ घातल्याने निवडणुकीत ज्यांचा शिक्षकी पेशाशी काडीमात्र संबंध नाही अशा उमेदवारांनीही गुडख्याला बांशिंग बाधलेले आहे.सध्या दहावीचे नवीन अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण सुरू असल्याने प्रचारासाठी उमेदवार आपली भूमिका मांडतांना दिसत आहे.परंतु टि.डी.एफच्या अंतर्गत वादामुळे समिकरण बदलण्याची शक्यता असून अपक्ष असलेल्या शिक्षक उमेदवाराला फायदा होईल अशी चर्चा प्रशिक्षणात शिक्षकामध्ये सुरू आहे.
   शिक्षक मतदार संघात नाशिक विभागात एकूण पाच जिल्हे येतात .उमेदवाराला प्रत्येकापर्यत जाणे कठीण असते.परंतु सुज्ञ मतदार असल्याने कोणाला मतदान करायचे हे शिक्षक मतदारांना नवीन सांगण्याची गरज नाही. सध्या काही धनदांडगे उमेदवार यांचे मेळावे सभा ताराकीत हाँटेलमध्ये होत आहे. हे शिक्षक जाणून असल्याने मागच्या निवडणुकीत ज्या चुका झाल्या आहेत त्यांची पुनरावृत्ती होणार नाही हे निश्चित...
   सध्या टी.डी.एफ मध्ये अंतर्गत वादामुळे खरा उमेदवार कोणता हे मतदारांना न उलगडलेले कोडं आहे.ज्याचा शिक्षकी पेशाशी काडीमात्र संबध नाही असे उमेदवार निवडणुकीत उभे असल्याने शिक्षक मतदार जाहीर विरोध करतांना दिसत आहे.या निवडणुकीत धनदांडगे उमेदवारांनी किती लक्ष्मीचा वर्षाव केला शिक्षक मतदार त्यांचा पराभव केल्यावाचून राहणार नाहीत अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
   टी.डिएफ मध्ये संदीप बेडसेला उमेदवारी दिल्याने तमाम जुने कार्यकर्ते नाराज झाले. ज्याचे काही योगदान नाही अशा उमेदवाराला उमेदवारी दिल्याने जळगांव जिल्ह्यातील शालीग्राम भिरुड, व  नगर जिल्ह्यातील भाऊसाहेब  कचरे यांनीही टीडीएफचे   उमेदवार म्हणून स्वतंत्र प्रचार सुरू केला आहे. जळगावचे शालीग्राम भिरुड यांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक शिक्षकांच्या समस्या सोडल्या असून त्याचे जळगांव जिल्ह्यात काम उल्लेखनीय आहे. ज्यांनी शिक्षकांचे प्रश्न, कलाध्यापकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव कटिबद्ध असतात अशा जळगांव माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शालीग्राम भिरूड यांनी वेगळी चुल मांडून आपला प्रचार जोरात सुरु आहे.भाऊसाहेब कचरे  हे पण स्वताला टि.डीएफचे उमेदवार समजून आपली वेगळी चुल मांडून टिडीएफचे कार्याध्यक्ष फिरोज बादशहा यांनी उमेदवारी देऊन त्यांचा नगर जिल्ह्यात प्रचार जोरात सुरू आहे. ते काल अमळनेरला आले असता दैनिक साईमतशी बोलतांना सांगितले की ज्याचा शिक्षण क्षैत्राशी काडीमात्र संबध नाही अशा उमेदवाराला मतदान करू नका जो कुणी शिक्षक असेल त्यालाच मतदान करा नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येते असे सांगितले.
   सध्यातरी टी.डी.एफच्या अंतर्गत वादामुळे व शिक्षक नसलेल्या उमेदवाराबाबत कमालीची नाराजी आहे.त्यामुळे खान्देशातील अपक्ष उमेदवार व पेशाने माध्यमिक शिक्षक असलेले विलासराव शांताराम पाटील  यांना फायदा होण्याची शक्यता आहे.त्यांची कर्मभूमी जळगांव जिल्हा असून कर्मभूमी धुळे जिल्हा असल्याने त्याचा संपर्क मोठा आहे.त्यांचे वडील माध्यमिक शिक्षक होते.त्यांनी ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या माध्यमातून खान्दैशातील आतापर्यंत एकहजार शिक्षकांचा गुणगौरव केला असुन शिक्षक सुरक्षितेसाठी शिक्षक सुरक्षा कायदयाची मागणी करणारे पहिले उमेदवार आहेत. अभ्यासू व अनेक प्रश्न त्यांनी मांडले आहेत त्यामुळे शिक्षकामध्ये त्याच्याबद्दल आस्था आहे.जळगांव, धुळे,नगर, नाशिक, नंदुरबार येथे त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे.
   एंकदरीत पहाता या शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत शिक्षक नसलेल्या उमेदवारांना घरचा रस्ता मतदार दाखवतील हे निश्चित. सर्व शिक्षकामध्ये एकच चर्चा शिक्षक आमदार हा शिक्षकालाच पहिली पसंती मिळेल. धनदांडगे उमेदवार पैशाचे आमिष दाखवतील, पार्टी या गोष्टीकडे शिक्षक मतदारांनी लक्ष न देता किंवा दिले तर घेतील आणि योग्य शिक्षक असलेल्या उमेदवारालाच मतदान करतील हे निश्चित ... सध्या तरी शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत हे तिनच उमेदवार शिक्षक असल्याने त्यांना शिक्षक बांधव पहीली पसंती देतील यात काही शंका नाही. पण तिघामध्ये सध्यातरी विलासराव पाटील यांचे पारडे जड आहे.अनेक संघटनाचा त्यांना जाहीर व छुपा पाढींबा आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.