Halloween party ideas 2015

दुभती गाय विकून सासूनं सुनेसाठी बांधलं शौचालय

गया:

बिहारमधील गया जिल्ह्यातील तेवारीचक गाव सध्या चर्चेत आहे. तेवारीचक गावातील तेतरी देवी यांनी दुभती गाय विकून शौचालय बांधून 'दुधापेक्षा स्वच्छता आणि सन्मान महत्त्वाचा' असा संदेश दिला आहे. तेतरी यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, प्रखंड कार्यालयातर्फे तेतरी यांनासन्मानित करण्यात करण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपूर्वी बिहारच्या चंपारण जिल्ह्यातून पंतप्रधान मोदी यांनी संपुर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश दिला होता. हाच संदेश आता देशातील खेड्यापाड्यात पोहचत असल्याचं दिसून येत आहे. बिहारच्या गया जिल्ह्यातील तेवारीचक गावातील ७० वर्षीय तेतरी देवी यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं आपल्या कुटुंबासोबत त्या इंदिरा आवास योजनेतून मिळालेल्या घरात राहतात. नुकतच त्याच्या मुलाचं लग्न झालं. नवीन सुन घरी आली. पण,तेतरी यांना घरात शौचालय नसल्याची खंत वाटत होती. आर्थिक समस्यांमुळं शौचालय बांधण्यात अडथळे येत होते.

'घरात आलेल्या सुनेनं शौचालय बांधण्यासाठी तिचे दागिने देखील विकण्यासाठी दिले होते, पण स्त्रीधन असल्यानं मी तिला दागिने विकू दिले नाहीत' असं तेतरी यांनी सांगितलं. यानंतर घरातील दुभती गाय विकण्याचा निर्णय घेण्यात आला. गाय विकल्यानंतर मिळालेल्या १४ हजार रुपयांतून शौचालय बांधण्यासाठी लागणाऱ्या विटा, सिमेंट आणि इतर सामानाची खरेदी केली. गाय विकल्यामुळं आता घरी दुधाची कमतरता भासत असली; तरी घरी शौचालय असणं देखील महत्त्वाचं होतं, असंही तेतरी देवी सांगतात.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.