*दहावीच्या इतिहासाच्या
नवीन पाठयपुस्तकात महात्मा फुलेच्या कार्याची दखल*
अमळनेर प्रतिनिधी-दहावीच्या नवीन इतिहासच्या पाठयपुस्तकात शिक्षणाचे आधारस्तंभ महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याचा आढावा व पुस्तकांच्या मुखपृष्ठावर महात्मा फुलेचा फोटो असल्याने त्यांच्या कार्याची महती विदयार्थायांना समजणे सोपे होईल असे अमळनेर येथे जी.एस.हायस्कूल मध्ये दहावीच्या इतिहास विचार विषयाचे तंज्ञ मार्गदर्शक एन.एन.न्हावी यांनी सांगितले.
व्यासपीठावर शिक्षणाविस्ताराधिकारी पी.डी.धनगर, तंज्ञ मार्गदर्शक वानखेडे, पी.पी.पाटील होते.
तंज्ञ मार्गदर्शक एन.एन.न्हावी म्हणाले कि इतिहास विषयाचे पुस्तक अत्यंत सुबक व रंगीत असल्याने विदयार्थी त्याचे स्वागत करतील. व नवीन पुस्तकात विदयार्थी हिताला प्राधान्य दिले आहे.,राष्ट्रीय मूल्यांची सांगळ घातली आहे.तर चोबारी हायस्कूलचे तंज्ञ मार्गदर्शक प्रकाश पाटील यांनी मनोरंजनाची साधने,खेळ,पर्यटन, व कलांचा इतिहास यावर सविस्तर मार्गदर्शन केले.पाठयपुस्तकातील मनोरंजनाची साधने यावर सतीश कागणे यांनी गाणे सादर करूण वातावरण निर्मिती केली दिवसभर हसतखेळत अध्यापनाचे काम सुरळीत पार पडले.यावेळी विलास चौधरी,व्हि.के.वानखेडे, एन.आर.चौधरी, ए.के.धनगर, आर.एम.देशमुख, देवेंद्र पाटील, कमलेश विसपुते, भरत पाटील, सतीश कागणे,ईश्वर महाजन व शिक्षक व शिक्षीका उपस्थित होते.उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्याबद्दल प्रकाश पाटील, एन.एन.न्हावी यांचे आभार प्रशिक्षणार्थी यांनी मानले.