अमळनेर प्रतिनिधी-
तेली समाज पंचमंडळ कार्यकारिणी जाहीर
मारवड ता अमळनेर: येथील श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज पंच मंडळाचे कार्यकारी मंडळाची निवड ज्येष्ठ सदस्य भगवान हिरामण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समाजबांधवांच्या उपस्थितीत बिनविरोध करण्यात आली. सदरची निवडही पाच वर्षांसाठी करण्यात आलेली आहे. या प्रसंगी कार्यकारी मंडळाचे दिवंगत सदस्य बापू बाबुराव चौधरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संताजी महाराज पुण्यतिथी सोहोळ्याचा आढावा सचिव प्रदीप चौधरी यांनी घेतला. नूतन कार्यकारणी मंडळ पुढील प्रमाणे अध्यक्ष- लोटन जगन्नाथ चौधरी, उपाध्यक्ष- अशोक भोजु चौधरी, सचिव- प्रदीप भिका चौधरी, सहसचिव- मधुकर बाबुराव चौधरी, सदस्यगण- नारायण जगन्नाथ चौधरी, मधुकर धुडकू चौधरी, छोटू शंकर चौधरी, किरण गुलाब चौधरी, गजानन चौधरी, विनोद बापू चौधरी, पंकज अशोक चौधरी. मंडळाचे मार्गदर्शक म्हणून शांताराम चौधरी, आसाबंर चौधरी, कांतीलाल चुडामण चौधरी, नथु शामराव चौधरी, धोंडू रुपचंद चौधरी हे कामकाज सांभाळतील. नूतन कार्यकारिणी मंडळाचे आमदार शिरीष चौधरी, आमदार सौ स्मिता उदय वाघ, हिरा उद्योग समूहाचे डॉक्टर रवींद्र चौधरी, जिप सदस्या सौ जयश्री अनिल पाटील, प.स. सदस्य सौ कविता पवार, कृषी उत्पन्न समितीचे संचालक प्रफुल्ल पवार, ्रामपंचायत सदस्य उमाकान्त चौधरी, रत्नाबाई पीतांबर चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य व्ही आर पाटील, सुभाष चौधरी ग्राप सरपंच उमेश साळुंखे, शांताराम चौधरी, माजी सरपंच बापू चौधरी, जयंतराव पाटील, शांताराम साळुंखे, पत्रकार संघाचे डॉक्टर विलास पाटील, महत्व चौधरी आधार चौधरी शिवाजी चौधरी सर्व समाज बांधव व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.